शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या यंत्रापासून दूर साजरी करा होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 16:46 IST

नाशिक : होळी , धुळवड आणि रंगपंचमी सणाचा उत्साह साजरा करताना कोणताही अपघात घडू नये यासाठी महावितरणने ग्राहकांना विजेपासून ...

ठळक मुद्देमहावितरणचे आवाहन : रंग खेळतानाही अपघाताचा धोका

नाशिक : होळी, धुळवड आणि रंगपंचमी सणाचा उत्साह साजरा करताना कोणताही अपघात घडू नये यासाठी महावितरणने ग्राहकांना विजेपासून दूर राहत सणाचा आनंद लुटण्याचा सल्ला दिला आहे. विजेच्या यंत्रणेजवळ आग, पाणी यांचा संपर्क आल्यास दुर्घटना घडू शकते ही शक्यता गृहित धरून अशा प्रकारच्या सणाच्या काळात अपघाताचा धोका टाळण्यासाठी ग्राहकांना सूचना करण्यात आलेल्या आहेत.सणाच्या काळात उत्साहाच्या भरात सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केले जाते. यातून अपघात घडण्याची शक्यता असते. त्यामुळे बालगोपाळांनी काळजी आणि दक्षता घेण्याबरोबरच पालकांनीदेखील आपल्या पाल्यांच्या खेळण्याकडे लक्ष देणे अपेक्षित आहे. त्यांना धोक्याची कल्पना देण्याच्यादृष्टीने महावितरणने विजेच्या संभाव्य धोक्याबाबत ग्राहकांना आवाहन केले आहे.रंगोत्सव साजरा करताना पाण्याचा फवारा वीज वाहिन्यांपर्यंत उडणार नाही याची खबरदारी घ्यावी, रंग भरलेले फुगे परस्परांवर टाकताना ते वीज वितरण यंत्रणांना लागणार नाहीत, ओल्या शरीराने वीज वितरण यंत्रणांना स्पर्श करू नये, विजेच्या खांबाभोवती पाण्याचा निचरा होणार नाही याची दक्षता घ्यावी, घरात होळी खेळताना वीजमीटर, विजेचे प्लग, वीजतारा व वीज उपकरणांचा पाण्यापासून बचाव करावा, ओल्या हाताने या वस्तू हाताळू नये, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.होळी पेटवितानादेखील दक्षता बाळगणे गरजेचे असल्याचे महावितरणने म्हटले आहे. जेथे होळी पेटवायची आहे तेथे सभोवताली वीज वाहिन्या किंवा रोहित्र नाहीत ना याची खातरजमा करूनच होळी पेटवावी. अन्यथा होळीच्या ज्वाळांनी वीजवाहिन्या वितळून जिवंत तार खाली पडणे व यातून अपघाताचा धोका संभवतो.

टॅग्स :NashikनाशिकHoliहोळी