शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

रंगपंचमीसाठी रहाड खोदकामाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 17:54 IST

नाशिक : शहरातील पेशवेकालीन रहाडींमध्ये रंगणारा नाशिकचा रंगपंचमी सोहळा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असून, या उत्सवासाठी रहाडी खोदकामास ...

ठळक मुद्देरंगोत्सव : पेशवेकालीन रहाडीची परंपरा

नाशिक : शहरातील पेशवेकालीन रहाडींमध्ये रंगणारा नाशिकचा रंगपंचमी सोहळा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असून, या उत्सवासाठी रहाडी खोदकामास सुरुवात झाली आहे. रहाडीतील रंगपंमची ही नाशिकची ओळख असून, नाशिककरांनी ही परंपरा आजही कायम राखली आहे. नैसर्गिक रंगाने आणि फुलांच्या सजावटीने भरलेल्या रहाडीत रंगखेळण्याच्या या उत्सवात नाशिककर आवर्जून सहभागी होतात. येत्या सोमवारी रंगपंचमी साजरी होणार असून, त्यासाठी आतापासून रहाडींच्या खोदकाला सुरुवात झाली आहे.जूने नाशिकसह पंचवटी परिसरातील रहाडींवर रंग खेळणाऱ्यांची मोठी संख्या आहे. सरदार चौक, तिवंधा लेन, दिल्ली दरवाजा येथील रहाडींमध्ये दरवर्षी मोठ्या जल्लोषात रंगपंचमी खेळली जाते. वीस ते पंचवीस फूट लांबी-रुंदी आणि पाच ते सहा फूट खोल अशी पुरातन रहाडीची रचना आहे. या रहाडीमध्ये नैसर्गिक रंगाने रंग तयार करून विधीवित पूजा झाल्यानंतर या रहाडीत उड्या घेतल्या जातात. काहींना यात आणून टाकले जाते. एकमेकांना राहडी ओढून त्यांना रंगाने चिंब भिजविले जाते.अत्यंत जुन्या अशा या दगडी रहाडी असून काहींचा शोध अलीकडेच लागला आहे. दरवर्षी रंगपंचमी आली की या रहाडी पुन्हा खुल्या केल्या जातात. रहाडीवरील मातीकाम आणि त्याखालील फळ्या काढल्यानंतर रहाड दृष्टीस पडते. शहरातील अशा रहाडींच्या खोदकामाला शुक्रवारी प्रारंभ झाला. रहाड खोदण्यापूर्वी देखील विधीवत पूजा करून खोदकामाला सुरुवात होते. नाशिकची रंगपंचमी म्हटली की पंचवटी, जुने नाशिकमधील रहाडींची रंगोत्सव सर्वांनाच आठवतो. पारंपरिक पद्धतीने या रहाडींमध्ये रंगाचा सण सार्वजनिकरीत्या साजरा केला जातो. या उत्सवासाठी दरवर्षी परिसरातील कार्यकर्ते मागीलवर्षी बुजविलेली रहाड खोदण्याचा कामाला सुरुवात करतात.त्यानुसार अशा रहाडी खोदकाम करण्यास प्रारंभ झालेला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकrangoliरांगोळी