शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
5
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
6
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
7
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
8
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
9
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
10
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
11
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
12
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
13
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
14
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
15
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
16
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
17
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
18
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
19
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
20
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!

डिझेल नसल्याने नाशिकच्या बसेसला ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 20:01 IST

नाशिक : आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागातील बसेसला लागणारे इंधन उपलब्ध नसल्याने बाहेरगावी जाणाºया आणि ...

नाशिक : आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागातील बसेसला लागणारे इंधन उपलब्ध नसल्याने बाहेरगावी जाणाºया आणि बाहेरगावाहून आलेल्या बसेसला ब्रेक लागला आहे. डिझेल नसल्याने सर्व बसेस डेपोतच उभ्या असून, चालक-वाहकांना सक्तीची रजा घेण्याच्या सूचना देण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्येदेखील तीव्र नाराजी आहे. दरम्यान, या प्रकरणी विभागीय कार्यालयात अधिकाºयांची तातडीने बैठक होऊन डिझेल उपलब्ध करून देण्याबाबत सुमारे तासभर चर्चा सुरू होती.राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागातील १३ डेपोंमधून जिल्हा आणि जिल्ह्याबाहेर धावणाºया बसेसला सुमारे ५५ हजार लिटर डिझेल दररोज लागते. यासाठी सुमारे ५० लाख रुपयांचा भरणा तेल कंपन्यांना रोजच्या रोज करावा लागतो. मात्र आर्थिक संकटाचा सामना करणाºया महामंडळाकडून तेल कंपन्यांचे पुरेसे देयक अदा केले नसल्याने अपेक्षित डिझेल प्राप्त होत नसल्याने गेल्या दोन दिवसांपासून विभागातील बसेसला काही प्रमाणात ब्रेक लागला आहे. रविवारी दुपारनंतर डिझेल तुटवड्याची झळ बसू लागल्याने काही फेºया बंद करण्याची वेळ आली. तातडीची गरज म्हणून जिल्ह्यातील तीन डेपोंमधून प्रत्येकी ५० हजार लिटर्स डिझेल तातडीने मागविण्यात आले.आर्थिक संकटाचा सामना करावा लागणाºया महामंडळाच्या नाशिक विभागालादेखील गेल्या दोन दिवसांपासून झळ सोसावी लागत आहे. रविवारी दुपारनंतर डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने काही मार्गांवरील बसेसच्या फेºया कमी करण्यात आल्या. सोमवारी मात्र संपूर्ण यंत्रणा कोलमडून पडली. बाहेरगावाहून आलेल्या बसेसदेखील डिझेल नसल्यामुळे नाशिकमध्येच अडकून पडल्या होत्या. जिल्ह्यातील लांब पल्ल्याच्या गाड्यांनादेखील डेपोतून थांबविण्यात आले. गाड्याच धावत नसल्यामुळे चालक-वाहकांना सक्तीची रजा घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. सायंकाळी ५ वाजेपर्यंत हा सारा प्रकार सुरू होता. त्यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण बसयंत्रणा कोलमडून पडली होती.

टॅग्स :NashikनाशिकPublic Transportसार्वजनिक वाहतूक