शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

समूहातील चारही धरणे १०० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 17:32 IST

नाशिक : यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झालेली आहे. जिल्ह्यातील २४ मोठ्या, मध्यम व लघु ...

ठळक मुद्देविसर्ग वाढणार : संततधार सुरू झाल्याने पातळीत वाढ

नाशिक : यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झालेली आहे. जिल्ह्यातील २४ मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत १३ टक्केअधिक पाणीसाठा असून, पाण्याची पातळी अजूनही वाढतच आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात असलेल्या चारही धरणांचा साठा १०० टक्के इतका झाल्याने धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पाण्याची पातळी सातत्याने वाढत असल्यामुळे रात्रीतून विसर्ग वाढविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.नाशिक शहराची तहान भागविणाºया गंगापूर धरण समूहात गंगापूर धरणासह कश्यपी, गौतमी गोदावरी आणि आळंदी या धरणांचा समावेश होतो. गंगापूर धरण समूहातील अन्य धरणांच्या तुलनेत सर्वांत मोठे धरण असून उर्वरित तीनही धरणे मध्यम प्रकल्पातील आहे. सद्यपरिस्थितीतही चारही धरणे शंभर टक्केभरली आहेत. यामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटली असून, शेतीची कामेदेखील सुरू आहेत. मागील आठवड्यातच १०० टक्के झालेले धरण सलग दहा दिवसांनंतरही कायम असून, शनिवारपासूनच पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सोमवारी विसर्ग अधिक वाढविण्यात आला असून, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आली आहे.

टॅग्स :NashikनाशिकDamधरण