शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

कोरोनाला अटकाव : नाशिक जिल्हा परिषदेच्या आठ अधिकाऱ्यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 16:13 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याबरोबरच संचारबंदीच्या काळात ग्रामीण भागातील जनतेला जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा त्याच बरोबर मुलभूत सुविधा पोहोचविणे सुखकर व्हावे

ठळक मुद्देजनतेला सुविधा देणारसंचारबंदीच्या काळात ग्रामीण भागातील जनतेला जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधित रूग्ण सापडल्यामुळे जिल्हा परिषदेने त्याची गंभीर दखल घेतली असून, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याबरोबरच संचारबंदीच्या काळात ग्रामीण भागातील जनतेला जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा त्याच बरोबर मुलभूत सुविधा पोहोचविणे सुखकर व्हावे यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्हा परिषदेच्या आठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या अधिका-यांना कामांचे वाटप करण्यात आले आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रामुख्याने हे अधिकारी आपले लक्ष केंद्रीत करतील व त्यांच्या कामांचा दैनंदिन अहवाल सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. या अधिका-यांमध्ये प्रकल्प संचालक उज्वला बावके यांना ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समुह तसेच निधीचे नियोजनाची जबाबदारी सोपविण्यात आली असून, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे यांना परदेशातून ग्रामीण भागात येणाºया नागरिकांची नोंद घेणे तसेच त्यांना घरातच विलीगीकरण कक्षात ठेवण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सुचना आहेत. वित्त व लेखा अधिकारी महेश बच्छाव यांना आवश्यक त्या औषधांची उपलब्धतता करून देण्याची तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेलकंदे यांना आरोग्य केंद्रातील सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी व कर्मचा-यांची हजेरीबाबत नोंद घेण्याचे काम सोपविण्यात आले आहे. कार्यकारी अभियंता मंगेश खैरनार यांना सर्व गावांमधील पाणी पुरवठा सुरूळीत ठेवणे त्याच बरोबर रूग्णवाहिकांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र परदेशी यांना ग्रामीण भागातील सार्वजनिक वितरण प्रणालवर देखरेख त्याच बरोबर ग्रामपंचायतींमध्ये औषध फवारणीवर लक्ष ठेवण्याचे काम सोपविण्यात आले आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपक चाटे यांच्यावर अंगणवाडीतील बालकांवर ताजा पोषण आहार पुरविण्याची तर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्यावर शालेय पोषण आहार वितरणाबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची सुचना आहे. आरोग्य विभागाचे विशाल नायडू यांच्यावर कोरोना संदर्भात शासनाकडून येणाºया माहितीचे संकलन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद