नाशिक : जुने नाशिकमधील गंजमाळ परिसरात भीमवाडी झोपडपट्टी जवळ अज्ञात हल्लेखोरांनी अरबाज शेरखान पठाण (१९, रा. भीमवाडी, सहकारनगर) नावाच्या तरुणावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात अरबाज गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. टोळक्याने आलेल्या हल्लेखोरांनी धारधार शस्त्रांनी अरबाज वर हल्ला चढविला. त्याच्या पोटावर व छातीवर सपासप वार केल्याने अतिरक्तस्राव होऊन तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. जखमी अवस्थेत त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. घटनेनंतर काही वेळेतच जिल्हा रुग्णालयात मोठा जमाव जमल्याने एकच गोंधळ उडाला. आपत्कालीन कक्षात मयताच्या नातेवाईकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याने अन्य रुग्णांना अन्य कक्षात हलविण्यात आले. त्याच्या मागे एक भाऊ, आई, वडील, बहीण असा परिवार आहे. हल्ल्याचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही.बुधवारी (दि.१६) अजमेर येथे दर्शनासाठी मित्रांसोबत तो जाणार होता. मात्र या हल्ल्यात दुर्दैवी त्याचा मृत्यू झाला.
नाशिकमध्ये युवकाला टोळक्याने भोसकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 22:53 IST
बुधवारी (दि.१६) अजमेर येथे दर्शनासाठी मित्रांसोबत तो जाणार होता. मात्र या हल्ल्यात दुर्दैवी त्याचा मृत्यू झाला.
नाशिकमध्ये युवकाला टोळक्याने भोसकले
ठळक मुद्देहल्लेखोरांनी धारधार शस्त्रांनी अरबाज वर हल्ला चढविला. डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले.