शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमधील तरुणांचे राज्यातील हिंसाचाराच्या घटनांबाबत मंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 01:14 IST

शहरातील विविध संघटनांमध्ये कार्यरत तरुणांनी रविवारी (दि.१६) येथील प्रमोद महाजन उद्यानात एकत्र येत ‘वन बिलियन रायझिंग’ (ओबीएन) संकल्पना समजावून घेत राज्यात सध्या सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटनांवर विचारमंथन केले. हिंसाचाराच्या घटनांमुळे तरुणांमध्ये असलेली अस्वस्थता यानिमित्ताने व्यक्त झाली.

नाशिक : शहरातील विविध संघटनांमध्ये कार्यरत तरुणांनी रविवारी (दि.१६) येथील प्रमोद महाजन उद्यानात एकत्र येत ‘वन बिलियन रायझिंग’ (ओबीएन) संकल्पना समजावून घेत राज्यात सध्या सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटनांवर विचारमंथन केले. हिंसाचाराच्या घटनांमुळे तरुणांमध्ये असलेली अस्वस्थता यानिमित्ताने व्यक्त झाली.सध्या महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना पाहता त्यावर मुक्त चर्चा होणे गरजेचे आहे. वन बिलियन रायझिंगच्या माध्यमातून या विषयावर मार्ग काढण्यासाठी विविध संघटनांच्या प्रतिनिधींची आणि तरुणांची बैठक झाली. यात अत्याचाराच्या घटनांबाबत साधकबाधक चर्चा झाली. एकत्र येऊन हिंसाचाराच्या विरोधात काही तरी उपक्रम करावा, असे मत बहुतेकांनी व्यक्त केले. यासंदर्भात अनेक आंदोलन, कॅन्डल मार्च होतात पण त्याचा फारसा फरक पडत नसल्याचे दिसून येते. याची सामाजिक बाजूही समजावून घेणे आवश्यक आहे. पुरुषप्रधान संस्कृती, जात धर्मावर आधारित विषमता, चित्रपटांचा प्रभाव या बाबीही समजावून घेणे आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. नाशिक ओबीएन ग्रुपच्या सदस्यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.हिंसेच्या विरोधात १०० कोटी१४ फेब्रुवारी, व्हॅलेंटाइन डे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. याचदिवशी २०१२ मध्ये ईव्ह एक्सलर या एका अमेरिकन कार्यकर्तीने जगभरात महिलांवर होणाºया हिंसेला विरोध करत प्रेमाचा संदेश देण्यासाठी ‘वन बिलियन रायझिंग’चे आवाहन केले. वन बिलियन रायझिंग म्हणजे हिंसेच्या विरोधात १०० कोटी. संयुक्त राष्टÑसंघाच्या अभ्यासानुसार जगभरात प्रत्येक तीनपैकी एक स्री हिंसा सहन करते, जगभरात १०० कोटी महिला हिंसा सहन करतात.

टॅग्स :NashikनाशिकPoliticsराजकारण