शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

जगातील सर्वांत मोठे गांधीजींचे धातुशिल्प नाशिकमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 01:43 IST

राष्टपिता महात्मा गांधी यांची १५०वी जयंती येत्या दि. २ आॅक्टोबर रोजी साजरी होणार असून, त्यानिमित्ताने त्यांच्या विचारांना उजाळा देण्याचे कार्यक्रम देशभरात होणार आहेत. महात्मा गांधींच्या संकल्पनेतील ‘नई तालीम’ शिक्षणप्रणालीचा प्रसार व्हावा, त्यांच्या विचारांची आणि कार्याची माहिती नव्या पिढीला व्हावी या उद्देशाने महात्मा गांधींचे जगातले पहिले सर्वांत मोठे धातू शिल्प नाशिकच्या इस्पॅलियर हेरिटेज शाळेत साकारण्यात आले आहे.

सातपूर : राष्टपिता महात्मा गांधी यांची १५०वी जयंती येत्या दि. २ आॅक्टोबर रोजी साजरी होणार असून, त्यानिमित्ताने त्यांच्या विचारांना उजाळा देण्याचे कार्यक्रम देशभरात होणार आहेत. महात्मा गांधींच्या संकल्पनेतील ‘नई तालीम’ शिक्षणप्रणालीचा प्रसार व्हावा, त्यांच्या विचारांची आणि कार्याची माहिती नव्या पिढीला व्हावी या उद्देशाने महात्मा गांधींचे जगातले पहिले सर्वांत मोठे धातू शिल्प नाशिकच्या इस्पॅलियर हेरिटेज शाळेत साकारण्यात आले आहे. येत्या बुधवारी (दि. २) गांधी जयंती निमित्ताने हे शिल्प नाशिकरांसाठी खुले करण्यात येईल.त्र्यंबक विद्यामंदिरजवळील इस्पॅलियर हेरिटेज शाळेत सचिन जोशी यांच्या संकल्पनेतून मूर्तिकार श्याम लोंढे यांनी धातू शिल्पाची डिझाइन आणि निर्मिती केली आहे. हे स्तंभ धातू शिल्प एक विशिष्ट अँगलमध्ये उभे राहिल्यानंतरच महात्मा गांधींची प्रतिमा दिसते. सृजनात्मक कलानिर्मिती असून, जमिनीपासून तब्बल २५ फूट उंच आहे. यासंदर्भात माहिती देताना शाळेचे संचालक सचिन जोशी यांनी सांगितले की, इस्पॅलियर हेरिटेज शाळेच्या प्रांगणात श्याम लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम महेश बच्छाव यांनी संकल्पित चित्र तयार केले. यात अभियांत्रिकी विज्ञान याचा उपयोग करण्यात आला आहे, अशीही माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.महात्मा गांधींचे धातू शिल्प उभारतांना ३० लेझरकट स्टील कॉलम (स्तंभ) २० फूट उंच, १८ फूट रु ंद, जमिनीपासून २५ फूट उंच असलेले शिल्प साकारण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागला. इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड आणि एशिया बुक आॅफ रेकॉर्ड मध्ये या शिल्पाची नोंद झाली आहे. जगातील हे पहिलेच धातू शिल्प आहे. २०२० मध्ये प्रकाशित होणाऱ्या ग्रँड मास्टर्स कॅटेगिरीत स्तंभ धातू शिल्पाची निवड झाली आहे. हे धातू शिल्प दि. २ आॅक्टोबर (गांधी जयंती), दि. ३० जानेवारी (गांधी पुण्यतिथी), १५ आॅगस्ट (स्वातंत्र्य दिन), २६ जानेवारी, ५ सप्टेंबर (शिक्षक दिन) या दिवशी जगातील पर्यटकांना पाहण्यासाठी खुले राहणार आहे.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीSchoolशाळा