शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक आता रशियन शहराची सिस्टर सिटी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 01:03 IST

जगातील महानगर जोडून त्यांचा समान विकास करण्याच्या संकल्पेतून आता रशियन फेडरेशनने पुढाकार घेतला असून, तेथील उलान उडे या शहराची नाशिक शहर भगिनी (सिस्टर सिटी) करण्याचा प्रस्ताव आहे.

ठळक मुद्देराज्य सरकारकडून विचारणा : विविध प्रकल्पांची देवाणघेवाण होणार

नाशिक : जगातील महानगर जोडून त्यांचा समान विकास करण्याच्या संकल्पेतून आता रशियन फेडरेशनने पुढाकार घेतला असून, तेथील उलान उडे या शहराची नाशिक शहर भगिनी (सिस्टर सिटी) करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासंदर्भात राज्य सरकारने नाशिक महापालिकेला विचारणा केली असून, त्यासंदर्भातील प्रस्ताव शासनाला सादर करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.झपाट्याने विकसित होत असलेल्या नाशिक शहराचे नाव वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये घेतले जाते. नाशिक शहराचे भौगोलिक आणि धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन हे शहर जागतिक दर्जाचे व्हावे यासाठी शासकीय पातळीवरदेखील यापूर्वी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानाअंतर्गत नाशिक शहराची निवड करताना विकासाचा वेग, लोकसंख्या आणि तीर्थक्षेत्र हे तीन निकष महत्त्वाचे होते. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील ६२ शहरांत नाशिकचा समावेश होता. त्यानंतर केंद्र सरकाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात दुसºया टप्प्यात का होईना नाशिकची निवडदेखील या शहराचे महत्त्व अधोरेखित करणारीच आहे.या प्रस्तावानुसार उभय शहरांमध्ये आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि वैज्ञानिक उपक्रमांची देवाणघेवाण करणे, पीपीपीअंतर्गत उपक्रम राबविणे, दोन्ही शहरांमधील राजकीय व प्रशासकीय नेतृत्व विकसित करणे या स्वरूपाचे उपक्रम असतील. सिस्टर सिटी डेव्हलपमेेंटचा प्रस्ताव तीन वर्षांसाठी असेल आणि सहा महिने मुदतवाढ देता येणार आहे.जर्मन सरकारकडून यापूर्वी प्रस्तावनाशिक शहर सिस्टर सिटी म्हणून विकसित करण्यासाठी यापूर्वीदेखील जर्मन सरकारने प्रस्ताव पाठविला होता. त्यानंतर चीन सरकारचादेखील एक प्रस्ताव होता. महापालिकेने त्यास होकारही भरला होता; परंतु नंतर डोकलामवरून भारत-चीन संबंध ताणले गेले आणि हा विषय मागे पडला. आता रशियन फेडरेशनकडून नवा प्रस्ताव सादर करण्यात आला असून, त्यामुळे केंद्र सरकारने हा राज्य सरकारकडे आणि तेथून तो महापालिकेला सादर करण्यात आला आहे.

टॅग्स :NashikनाशिकSmart Cityस्मार्ट सिटी