शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Nashik: ज्यांच्या प्रचाराची सांभाळली होती धुरा, त्यांच्याशीच आता घेतला पंगा

By suyog.joshi | Updated: April 25, 2024 14:15 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभेच्या दिंडोरी मतदारसंघात दिवसेंदिवस लढत रंगत असून एकेकाळी ज्यांच्याबरोबर काम केले, ज्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली अशा महाविकास आघाडीच्या भास्कर भगरे यांनी महायुतीच्या डॉ. भारती पवार यांच्याविरोधातच शड्डू ठोकत आव्हान दिले आहे.

- सुयाेग जोशीनाशिक - लोकसभेच्या दिंडोरी मतदारसंघात दिवसेंदिवस लढत रंगत असून एकेकाळी ज्यांच्याबरोबर काम केले, ज्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली अशा महाविकास आघाडीच्या भास्कर भगरे यांनी महायुतीच्या डॉ. भारती पवार यांच्याविरोधातच शड्डू ठोकत आव्हान दिले आहे. त्यामुळे त्यांच्या या लढतीकडे साऱ्या जिल्ह्याचेच लक्ष लागून आहे.

अर्धशक्तिपीठ सप्तशृंगगड, रामशेज किल्ला, श्री क्षेत्र कर्दमाश्रम, श्री दत्तात्रेयांचे आजोळ करंजी, कोंगाईमाता मंदिर, चांदवड-कोटमगावची देवी मंदिरे आदी धार्मिक व ऐतिहासिक स्थळे असल्याने दिंडोरीची राज्यात स्वतंत्र ओळख आहे. कांदा व भाजीपाल्याचे आगार, द्राक्षपंढरीमुळे हा परिसर सधन मानला जातो. २००८ मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेत दिंडोरी लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. त्यापूर्वी तो जनता दलाचा बालेकिल्ला राहिलेला मालेगाव लोकसभा म्हणून देशभर परिचित होता. मूळचे काँग्रेसचे असलेले हरिश्चंद्र चव्हाण २००४ मध्ये कमळाच्या चिन्हावर मालेगावमधून निवडून आले. दिंडोरी लोकसभा अस्तित्वात आल्यानंतर २००९ आणि २०१४ मध्येही चव्हाण यांनी भाजपच्या साथीने बाजी मारली. २०१४ मध्ये हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासमोर माजी आदिवासी विकास मंत्री स्व. ए.टी.पवार यांच्या स्नूषा डॉ. भारती पवार राष्ट्रवादीकडून रिंगणात होत्या. त्यावेळी भास्कर भगरे हे राष्ट्रवादीचे दिंडोरी तालुकाध्यक्ष होते अन अजूनही तेच आहेत. त्यांच्यावरच भारती पवार यांच्या संपूर्ण प्रचाराची धूरा होती. तेच भगरे आता पवार यांच्याविरोधात उभे आहेत. त्यावेळी हरिश्चंद्र चव्हाण यांना ५,४२,७८४ मते तर भारती पवार यांना २,९५,१६५ मते पडली होती. चव्हाण हे २,४७,६१९ मतांनी निवडून आले होते.

पुढे २०१९ मध्ये भाजपने चव्हाण यांना नाकारून माजी मंत्री ए. टी. पवारांच्या स्नुषा डॉ. पवार यांना राष्ट्रवादीतून आयात करून उमेदवारी दिली. तर राष्ट्रवादीने धनराज महाले यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी भगरे यांनी महाले यांचाही प्रचारही सांभाळला होता. परंतु त्या निवडणुकीत भारती पवार यांना ५,६७,४७० तर महाले यांना ३,६८,६९१ मते पडली होती. त्यामुळे भारती पवार तब्बल १,९८,७७९ मतांनी विजयी झाल्या होत्या. २०१९ मध्ये भाजपने त्यांच्या रुपाने पहिली महिला खासदार आणि पहिल्यांदाच केंद्रीय राज्यमंत्रिपदही मतदारसंघाला मिळाले. त्यामुळे सद्यस्थितीत भारती पवार यांच्यासाठी एकेकाळी राष्ट्रवादीकडून प्रचाराची धूरा सांभाळणारे भगरे हे त्यांनाच कसे आव्हान देणार याकडे मतदारसंघाचे लक्ष लागून आहे.

डॉक्टर विरुद्ध शिक्षकपवार विरुद्ध भगरे यांच्यातील ही लढत म्हणजे केंद्रीय मंत्री यांच्याविरोधात एका शिक्षकामधील निकराची लढाई पहायला मिळणार आहे. भारती पवार यांच्यावर भाजप नेतृत्वाने विश्वास दाखवत पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी दिली आहे. त्या उलट भगरे हे शरद पवारांच्या विश्वासातील दिंडोरीतील राष्ट्रवादीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी भास्कर भगरे यांनी अनेक आंदोलन केली आहेत. भगरे हे माजी जिल्हा परिषद सदस्य देखील आहेत.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४dindori-pcदिंडोरीBharati pawarभारती पवारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४