नाशकातील वॉटरस्पोर्ट्स : वर्षापर्यटनाचे औचित्य साधत धनिक मंडळी लोणावळा-खंडाळ्याला जाऊन वॉटरस्पोर्टस्चा आनंद लुटत असली, तरी नाशिकच्या गोदाघाटावरचे चिमुकलेही कमी नाहीत. कुंभमेळ्यासाठी नव्याने बांधलेल्या घाटालगतच्या झाडाला दोरी बांधून त्यांनी अशी धमाल करीत आपणही मागे नसल्याचे दाखवून दिले.