शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

Nashik: नाशिकमधील गोदावरी नदीच्या पात्रात जलस्तर अचानक वाढला, एक रिक्षा, एक कार नदीत बुडाल्याची भीती

By अझहर शेख | Updated: August 7, 2022 20:29 IST

Godavari River Flood: नाशिक शहर आणि परिसरात आज पावसाचा जोर कमी असला तरी पंचवटी, म्हसरूळ, ओझर, आडगाव य उपनगरांमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे या भागातून येणारी गोदावरीची उपनदी वरुणा (वाघाडी) पूर आला.

- अझर शेख नाशिक- नाशिक शहर आणि परिसरात आज पावसाचा जोर कमी असला तरी पंचवटी, म्हसरूळ, ओझर, आडगाव य उपनगरांमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे या भागातून येणारी गोदावरीची उपनदी वरुणा (वाघाडी) पूर आला. पुराचे पाणी गाडगे महाराज पुलाखाली वेगाने आले. यामुळे नदीपात्रात उभ्या असलेल्या काही वाहनांपैकी दोन रिक्षा एक कार, पाण्यात वाहून गेली. दरम्यान, नागरिकांनी आणि स्थानिक जीवरक्षक दलांनी पाण्यात प्रवेश करून पाण्यात वाहून जाणारी एक रिक्षा बाहेर काढली. मात्र एक रिक्षा आणि कार गाडगे महाराज पुलाखाली गोदावरी नदीपात्रात बुडाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

तसेच  येथील नारोशंकर मंदिराच्या शेजारी नदीपात्रात असलेल्या गोपालदास समाधी मंदिराला लागून एक रिक्षा पाण्यात अडकून पडली आहे. पुरात सापडलेल्या एका रिक्षामध्ये प्रवासी होते. अचानक पाणी वाढल्याने त्यांनी बाहेर उड्या मारल्या. स्थानिकांनी आणि जीवरक्षक दलांच्या जवानांनी त्यांना वाचवल्याने मोठी दुर्घटना टळली.

दरम्यान, गोदावरीची उपनदी असलेल्या वाघाडीला अशा प्रकारे अचानक पूर येण्याची ही गेल्या काही वर्षांमधील पहिलीच वेळ आहे. नाशिकच्या मुख्य शहरात आज कमी पाऊस असला तरी गोदावरीचे पाणलोट क्षेत्र असलेल्या भागापैकी नाशिकच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. हेच पाणी वाघाडी नदीमधून वाहत येत गोदावरीला मिळाले. त्यामुळे अचानक पूरस्थिती निर्माण झाली. 

टॅग्स :Nashikनाशिकgodavariगोदावरीfloodपूर