शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक : शहरात दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट

By नामदेव भोर | Updated: September 20, 2022 17:48 IST

शहरात मागील काही दिवसात गुन्हेगारी कृत्यांमध्ये सातत्यने वाढ होत असताना दुचाकी चोरट्यांचाही शहरात सुळसुळाट सुटला आहे.

नाशिक : शहरात मागील काही दिवसात गुन्हेगारी कृत्यांमध्ये सातत्यने वाढ होत असताना दुचाकी चोरट्यांचाही शहरात सुळसुळाट सुटला आहे. विशेष म्हणजे वेगवेगळ्या इमारतींचा पार्किंगमधूनही दुचाकींची चोरी होत असल्यामुळे मोकळ्या जागेत वाहन पार्क करताना नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. 

नाशिक शहरात सोमवारी (दि.१९) एकाच दिवसी मुंबईनाका, इंदिरानगर व आडगाव पोलीस ठाण्यामध्ये प्रत्येकी एक दुचाकी चोरी झाल्याची तक्रार दाखल झाली आहे. यात मुंबईनाका भागातील पखाल रोड परिसरातून काळ्या रंगाची मोटार सायकल क्रमांक एमएच १५ एई ५८७६ अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी महोम्मद कैफ नाझीमुद्दीन काझी (२०, भक्तीनगर सोसायटी) याने दिलेल्या फिर्यादीनुसार मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्या आला आहे.

तर दुसरी घटना इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राणेनगर परिसरात  घडली आहे. याप्रकरणी कृषीनगर येथील नितीन शरद पाटील यांनी इंदिरानदर पोलीस ठाण्याच त्यांची मोपेड दुचाकी चोरी झाल्याची फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पाटील यांनी राणेनगर येथील अतुल्य रेणू होम्समध्ये पार्क केलेली मोपेड दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. तर आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीसरी घटना घडली आहे. विरेंद्र श्रीहरीप्रसाद द्वीवेदी (५०,रा. महालक्ष्मी अपार्टमेंट ) मोकाळ बाबानगर यांनी तपोवन पर्णकुटी मंदिरासमोर पार्क केलेली मोटार सायकल एमएच १५ ई यू ५४७९ अज्ञात चोरट्याने चोरून नेली. त्यामुळे त्यांनी आडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी दुचाकी चोरीचा गुन्हा दाखलकेला आहे.

टॅग्स :bikeबाईक