शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

देशात डिजीटल व्यवहारात नाशिक अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 19:42 IST

नोव्हेंबर २०१६ मध्ये मोदी यांनी चलनातून एक हजार व पाचशेच्या नोटा अचानक रद्द केल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी सरकारने आॅनलाईन व्यवहार तसेच प्लॅस्टिक मनीचा वापर अनिवार्य केला

ठळक मुद्देपायलट प्रोजेक्ट : व्यापा-यांच्या बैठकीत सादरीकरणएटीएम, पेटीएम, भीम अ‍ॅप अशा विविध माध्यमातून

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात नोटाबंदी जाहीर केल्यानंतर आॅनलाईन व्यवहारांवर भर देण्यासाठी ज्याकाही उपाययोजना शासकीय व बॅँकींग पातळीवर करण्यात आल्या, त्याचा आधार घेऊन आॅनलाईन व्यवहारात केरळ राज्यातील कोटायन पाठोपाठ नाशिकने अव्वल क्रमांक मिळविला आहे. केंद्र सरकारच्या नॅशनल पेमेंट कार्पोरेशन इंडिया या संस्थेने केलेल्या पाहणीतून हे स्पष्ट झाल्यामुळे नजिकच्या काळात नाशिक शहरात डिजीटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी पायलट प्रोजेक्ट राबविण्यात येणार आहे.शुक्रवारी नॅशनल पेमेंट कार्पोरेशनच्या अधिकाºयांनी जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत शहरातील व्यापा-यांच्या विविध अठरा संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. त्यात नाशिकने डिजीटल पेमेंट व्यवहारात घेतलेल्या आघाडीचा उल्लेख त्यांनी केला. नोव्हेंबर २०१६ मध्ये मोदी यांनी चलनातून एक हजार व पाचशेच्या नोटा अचानक रद्द केल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी सरकारने आॅनलाईन व्यवहार तसेच प्लॅस्टिक मनीचा वापर अनिवार्य केला होता. एटीएम, पेटीएम, भीम अ‍ॅप अशा विविध माध्यमातून देशभरात करण्यात आलेल्या व्यवहारांची बॅँकाकडून नॅशनल पेमेंट कार्पोरेशनने जी काही माहिती गोळा केली त्यात केरळच्या कोटायन शहरात व नाशिकमध्ये सर्वाधिक व्यवहार झाल्याचे दिसून आले. त्यामुळे आता नाशिक शहरात डिजीटल पेमेंटला अधिक वाव असल्याचे पाहून विविध व्यापारी संघटनांच्या मदतीने त्यांना ‘क्युआर कोड’मोफत देण्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. यासाठी ५ ते ७ फेब्रुवारी याकाळात नाशिक शहरात डीजीटल मेळावा घेण्यात येणार असून, त्यात सहभागी होणा-या सर्व व्यापारी संघटना व प्रतिनिधींना क्युआर कोड देण्यात येणार आहे. ज्या नागरिकांकडे भीम अ‍ॅप असेल त्यांना या क्युआर कोडचा अधिक उपयोग होणार असून, दोन हजार रूपयांपर्यंतच्या कोणत्याही खरेदीवर शुल्क न आकारण्याचे यावेळी सांगण्यात आले. या बैठकीस निवासी उप जिल्हाधिकारी रामदास खेडकर, तहसिलदार चंद्रकांत देशमुख यांच्यासह शहरातील सर्व व्यापारी संघटनांचे प्रमुख उपस्थित होते.

टॅग्स :bankबँकnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय