शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकला सहा मेट्रोसिटींची विमानसेवा सुरू होणार २१ डिसेंबरला घोषणा : उडानच्या दुसºया टप्प्यात समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 01:32 IST

देशातील महत्त्वांच्या शहरांना हवाई मार्गाने जोडण्याच्या पहिल्या टप्प्यात निराशा पदरी पडलेल्या नाशिकसाठी उडान योजनेचा दुसरा टप्पा महत्त्वाचा ठरला आहे.

ठळक मुद्देसंसदेसमोर शिवसेनेच्या वतीने आंदोेलन निविदा उघडण्याची प्रक्रिया पूर्ण विमानसेवेचे सर्वेक्षण जाहीर झाले

नाशिक : देशातील महत्त्वांच्या शहरांना हवाई मार्गाने जोडण्याच्या पहिल्या टप्प्यात निराशा पदरी पडलेल्या नाशिकसाठी उडान योजनेचा दुसरा टप्पा महत्त्वाचा ठरला आहे. रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम (रेस)च्या दुसºया टप्प्यात नाशिकमधून हैदराबाद, बंगळुरू, गोवा, भोपाळ, अहमदाबाद व दिल्ली या शहरांसाठी विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.दरम्यान, पहिल्या टप्प्यात उडान योजनेतून नाशिकमधून अन्य शहरांसाठी विमानसेवा सुरू न झाल्याने नाशिकला उडान योजनेच्या दुसºया टप्प्यातून वगळू नये, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी लावून धरली होती. शिवाय नाशिक-मुंबई व नाशिक-पुणे विमानसेवा सुरू न झाल्याने संसदेसमोर शिवसेनेच्या वतीने आंदोेलन केले होते. उडान योजनेच्या दुसºया टप्प्यात नाशिकसह राज्यातील अन्य महत्त्वाच्या शहरांतून सुरू होणाºया या विमानसेवेची प्रत्यक्ष घोषणा २१ डिसेंबरला केंद्र सरकारकडून होणार असल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले. ४ ते २० डिसेंबरदरम्यान दुसºया टप्प्यातील उडान योजनेत सहभागी झालेल्या विमान कंपन्यांची बीड (तांत्रिक सहभाग व निविदा उघडण्याची) प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानंतर नाशिक-भोपाळ, नाशिक-दिल्ली, नाशिक-हैदराबाद, नाशिक-गोवा, नाशिक-अहमदाबाद, नाशिक-बंगळुरू या विमानसेवांसाठी कोणत्या विमान कंपन्या उत्सुक आहेत याची सविस्तर माहिती सादर केली जाणार आहे. यापूर्वी नाशिक-दिल्ली व नाशिक-बंगळुरू विमानसेवेचे सर्वेक्षण जाहीर झाले असून, नाशिक-दिल्लीसाठी स्पाईस जेट ही विमान कंपनी, तर नाशिक-बंगळुरूसाठी एअर अलायन्स ही विमान कंपनी उत्सुक असल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले. दुसºया टप्प्यात नाशिकपासून सहा प्रमुख मेट्रोंसाठी प्रादेशिक हवाई सेवा अर्थात उडान योजनेंतर्गत सहा शहरांसाठी विमानसेवा सुरू होणार असल्याचे पत्र खासदार हेमंत गोडसे यांना भारतीय हवाई प्राधिकरणाच्या सचिवांनी कळविले आहे.नाशिक-मुंबईचा मुहूर्त टळणार १५ डिसेंबरपासून नाशिकहून मुंबई व पुणे येथे एअर डेक्कन विमान कंपनीने विमानसेवा सुरू करण्याचे जाहीर केले होते. मात्र, दक्षिण आफ्रिकेहून या कंपनीला विमान खरेदीसाठी २९ डिसेंबरला परवानगी मिळाली. त्यानंतर १९ सीटर असलेले विमान प्रत्यक्ष नाशिकला सर्व सोपस्कार पूर्ण होऊन पोहोचेपर्यंत ३१ डिसेंबर उजाडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही विमानसेवा १ जानेवारी २०१८ पासूनच सुरू होईल, असे दिसते.