शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून नाशिक सेनेत बंडाळी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 14:58 IST

येत्या दोन महिन्यात प्रत्यक्ष या निवडणुकीचा फड रंगणार असला तरी, शिवसेनेत तो आत्तापासूनच उमेदवारीवरून रंगू लागला आहे. गत निवडणुकीत सेनेचे संख्याबळ कमी असतानाही अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांनी राष्टÑवादीचे जयंत जाधव यांच्याशी काट्याची टक्कर दिली होती. तांत्रिक मुद्यावरून सहाणे यांची आमदारकी निसटली.

ठळक मुद्देदराडे की सहाणे : गटबाजीमुळे दोन्ही गट सक्रीयसहाणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून उमेदवारी मिळविण्याच्या मुद्यावरून शिवसेनेत बंड होण्याची चिन्हे दिसू लागली असून, त्याची सुरूवात एकमेकांच्या भेटी गाठी घेण्यापासून सुरूवात झाली आहे. गत वेळचे पराभुत अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांनी उमेदवारीवर दावा केलेला असतानाच जिल्हा बॅँकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्यासाठी एक गट कमालिचा सक्रीय झाल्यामुळे तुर्त दराडे यांचे पारडे जड दिसू लागल्याने प्रत्यक्षात निवडणुकीच्या तोंडावर पक्षात बंडाळी उफाळणे शक्य वाटू लागले आहे.येत्या दोन महिन्यात प्रत्यक्ष या निवडणुकीचा फड रंगणार असला तरी, शिवसेनेत तो आत्तापासूनच उमेदवारीवरून रंगू लागला आहे. गत निवडणुकीत सेनेचे संख्याबळ कमी असतानाही अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांनी राष्टÑवादीचे जयंत जाधव यांच्याशी काट्याची टक्कर दिली होती. तांत्रिक मुद्यावरून सहाणे यांची आमदारकी निसटली. त्यामुळे सहा वर्षापुर्वी पक्षासाठी दिलेल्या योगदानाचा विचार यंदाच्या निवडणुकीत होवून आपल्यालाच उमेदवारी मिळेल अशी ठाम खात्री सहाणे यांना वाटू लागली आहे व त्यादृष्टीने सहाणे यांनी पक्षांतर्गंत प्रचारही सुरू केला आहे. सोशल माध्यमाचा वापर करून त्यांनी तसे संकेत देणे सुरू केले आहे. दुसरीकडे सेनेतील एका गटाने जिल्हा बॅँ केचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्या उमेदवारीसाठी मोठी फिल्डींग लावली आहे. मध्यंतरी दराडे यांनी मातोश्रीवर जावून पक्ष अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेवून तशी तयारीही दर्शविल्याचे सांगण्यात येते. सुत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे दराडे यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली असून, पक्षाने त्यांना कामाला लागण्याचे आदेशही दिले आहेत. सहाणे यांना दराडे यांच्या उमेदवारीची कुणकुण लागल्यामुळेच की काय त्यांनी पर्याय म्हणून भाजपाची उमेदवारी करण्याचीही तयारी सुरू केल्याचे मानले जात आहे, त्याचाच भाग म्हणून मध्यंतरी सहाणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. नेमके याच गोष्टीचे भांडवल करून सहाणे विरोधकांनी कुरघोडी करण्यास सुरूवात केली आहे. सेनेंतर्गंत उमेदवारीवरून सुरू असलेल्या रस्सीखेचचा संबंध नुकत्याच झालेल्या स्थानिक पातळीवरील महानगरप्रमुखांच्या फेरबदलाशी लावला जात असून, ज्या गटाने हा फेर बदल करून आणला आता तोच गट दराडे यांच्या पाठीशी उभा राहिल्यामुळे सेनेतील गटबाजीचा फटका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत बसण्याची शक्यता दिसू लागली आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक