शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

धावपटू संजीवनी जाधव कडून पदकाची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 16:49 IST

नाशिक : चीन येथे होणाऱ्या  आशियाई क्रॉसकंट्री अजिंक्यपद अ‍ॅथेलेटिक्स स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय चमूतील धावपटू संजीवनी जाधव हिच्याकडून पदकाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात नाशिकच्या दोन धावपटूंचा सहभाग असल्याने या दोन्ही धावपटू चांगली कामगिरी करतील, अशी अपेक्षा तमाम नाशिककरांकडून व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देस्पर्धेच्या पहिल्याच दिवशी संजीवनीची स्पर्धाभारतीय संघ मजबूत असल्याच्या दावा

नाशिक : चीन येथे होणाऱ्या  आशियाई क्रॉसकंट्री अजिंक्यपद अ‍ॅथेलेटिक्स स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय चमूतील धावपटू संजीवनी जाधव हिच्याकडून पदकाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात नाशिकच्या दोन धावपटूंचा सहभाग असल्याने या दोन्ही धावपटू चांगली कामगिरी करतील, अशी अपेक्षा तमाम नाशिककरांकडून व्यक्त होत आहे.पटियाला येथील स्पर्धेतून कॉमनवेल्थसाठी पात्रता मिळविण्यास संजीवनीला अवघ्या एका मिनिटाचा वेळ कमी पडला असल्याने कॉमनवेल्थमध्ये खेळण्याचे संजीवनीचे स्वप्न भंगले आहे. असे असले तरी आशियाई क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी निवड झाल्याने संजीवनीला पुन्हा एकदा कामगिरी करून दाखविण्याची संधी मिळाली आहे. गेल्या वर्षभर अ‍ॅथेलेटिक्स आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके मिळविणारी संजीवनी कॉमनवेल्थची तयारी करीत असताना तिला त्यात यश आले नाही. असे असले तरी तिची आशियाई क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी झालेली निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे.संजीवनी आणि पूनम सोनुने, आॅलिम्पिकपटू ललिता बाबर आणि पाचवेळा आशियाई स्पर्धेचा अनुभव असलेली पुण्याची स्वाती गाढवे यांचा भारतीय संघात समावेश असल्यामुळे या संघाचे मनोधैर्य नक्कीच उंचावले असणार. संजीवनी ही मुख्य स्पर्धेत म्हणजेच ८ किलोमीटरमध्ये सहभागी होणार आहे तर पूनम ही अंडर-१२ गटात खेळणार आहे. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी संजीवनीची स्पर्धा असल्याने तिच्या कामगिरीकडे नाशिककरांचे लक्ष असणार आहे. नाशिकच्या या दोन्ही धावपटूंनी अ‍ॅथेलेटिक्समध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करीत आशियाई स्पर्धेपर्यंत मजली मारली आहे.संजीवनीचा फिजिकल फिटनेस प्रचंड असून, परदेशातील वातावरणातही ती चांगली कामगिरी करून देशाला पदक मिळवून देऊ शकते, असा विश्वास तिचे प्रशिक्षक वीजेंद्रसिंग यांनी व्यक्त केला आहे. पटियाला येथील स्पर्धेमुळे नाशिककरांनी काहीशी हळहळ व्यक्त केली होती. तसेच तिचे प्रशिक्षक वीजेंद्रसिंग यांनीदेखील संजीवनी कॉमनवेल्थमध्ये खेळू शकेल, असा विश्वास व्यक्त केला होता. परंतु अवघ्या मिनीटभराच्या अंतराने तिला कॉमनवेल्थ गाठता आले नसले तरी आता आशियाई क्रॉसकंट्रीत संजीवनी चांगली कामगिरी करेल, असा विश्वास तिच्या प्रशिक्षकांसह नाशिकच्या धावपटूंनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :NashikनाशिकSportsक्रीडा