नाशिकरोड : नाशिकरोड जेलमध्ये बैलपोळा आज दुपारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बैलांना सजवून आणण्यात आले. जेलचे अधीक्षक राजकुमार साळी यांच्या हस्ते बैलांची पूजा करण्यात आली. बैलांना पूरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला.दरम्यान, नाशिकरोड परिसरात ग्रामीण भाग असून शेती अजूनही टिकून आहे. शिंदे, पळसे, जाखोरी, सामनगाव, कोटमगाव, एकलहरे, मोहगाव बाभळेश्वर, विहितगाव, भगूर गाडेकर मळा, जेलरोड आदी परिसरात पारंपरिक पद्धतीने पोळा साजरा करण्यात आला. सुहासिनींनी बैलजोड्यांची पूजा केली. त्यांना नैवेद्य देण्यात आला. सायंकाळी बैलजोड्यांची मिरवणूक काढून गावातील मारु ती मंदिरात नेण्यात आले. तेथे देवाला सलामी देण्यात आली. नाशिकरोड जेलमध्ये गेल्यावर्षी साडेसहा कोटी, तर शेतीपासून गेल्या वर्षी चाळीस लाखांचे उत्पन्न मिळाले होते. कारागृहाची खुली शेती आहे. त्यांच्या सहाय्याने घेतलेल्या पिके आणि भाजीपाल्यापासून कारागृहातील साडेतीन हजार कैद्यांची गरज भागते. यावेळी पंडित धुळे, अशोक कारकर, पल्लवी कदम, रोहिदास गोळे, भगत, कासार आदी उपस्थित होते.
नाशिकरोडला पोळा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 01:37 IST