शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोड प्रभाग : क्रीडांगण, आरोग्य प्रश्नांकडे दुर्लक्ष; नगरसेवकांचा आरोप अतिक्रमणाच्या प्रश्नावर अधिकारी धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 00:24 IST

परिसरात वाढत चाललेले अतिक्रमण, मनपाच्या क्रीडांगणावरील असुविधा व बंद पथदीप आदी प्रश्नांवरून नाशिकरोड प्रभाग समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी प्रशासनावर प्रश्नांचा भडिमार करत धारेवर धरले.

ठळक मुद्देअतिक्रमणधारक आणि अधिकारी यांच्यामध्ये साटेलोटे फळविक्रेत्यांनी अतिक्रमण केले मनपाच्या मैदानाची स्वच्छतेअभावी दुरवस्था

नाशिकरोड : परिसरात वाढत चाललेले अतिक्रमण, मनपाच्या क्रीडांगणावरील असुविधा व बंद पथदीप आदी प्रश्नांवरून नाशिकरोड प्रभाग समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी प्रशासनावर प्रश्नांचा भडिमार करत धारेवर धरले.नाशिकरोड प्रभाग समितीची बैठक प्रभाग सभापती अनिता सातभाई यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दुपारी पार पडली. यावेळी नगरसेविका संगीता गायकवाड यांनी गायकवाड मळा, मुक्तिधाम परिसरातील अनधिकृत अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत असून, मनपा अधिकाºयांना वारंवार लेखी आणि तोंडी सांगूनही उपयोग होत नाही. अतिक्रमणधारक आणि मनपा अतिक्रमण विभागाचे अधिकारी यांच्यामध्ये आर्थिक साटेलोटे असल्याने हे अतिक्रमण काढण्यात येत नाही, असा आरोप गायकवाड यांनी केला. जेलरोड, सिन्नर फाटा परिसरात अतिक्रमण वाढले आहे. नाशिकरोड मनपा विभागीय कार्यालयाशेजारीच पदपथवर अधिकारी व नगरसेवकांच्या नाकावर टिच्चून फळविक्रेत्यांनी अतिक्रमण केले असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. नगरसेवक सत्यभामा गाडेकर यांनी, देवळाली गावातील आठवडे बाजारात अतिक्रमण विभागाचे कर्मचारी भाजीपाला विक्रेत्या शेतकºयांवर दादागिरी करीत असल्याने त्याच्यांवर अन्याय होत आहे. तसेच काही स्थानिक टवाळखोर या शेतकºयांकडून बाजार फी म्हणून खंडणी उकळीत असल्याने मनपाने पोलिसांच्या माध्यमातून भाजीपाला विक्रेत्यांना संरक्षण द्यावे, अशी सूचना गाडेकर यांना केली. तसेच आर्टिलरी सेंटर रोडवर पथदीप बंद पडलेले आहेत. जैन मंदिरासमोरील मनपाच्या मैदानाची स्वच्छतेअभावी दुरवस्था झाली असून, याबाबत संबंधित अधिकाºयांना सांगूनदेखील दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नगरसेविका ज्योती खोले यांनी केला. नगरसेविका सरोज अहिरे यांनी वडनेर दुमाला येथे डेंग्यूमुळे नागरिकांना प्राण गमवावा लागत असल्याने त्या भागातील वालदेवी नदीची स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी केली. बैठकीला नगरसेविका सुनीता कोठुळे, मीरा हांडगे, जयश्री खर्जुल, कोमल मेहरोलिया, संभाजी मोरूस्कर, रमेश धोंगडे, सूर्यकांत लवटे, प्रशांत दिवे, संतोष साळवे, पंडित आवारे, अंबादास पगारे, दिनकर आढाव, शरद मोरे, विशाल संगमनेरे, केशव पोरजे आदींसह अधिकारी उपस्थित होते.