शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

नाशिककरांनी साडेतीन लाखांचा भरला दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 23:24 IST

नाशिक : लॉकडाउन काळात सर्रासपणे दुचाकी घेऊन रस्त्यांवर वावरणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार विविध कलमांतर्गत कारवाई करून पोलिसांनी ३ लाख ६३ हजार ४०० रुपयांचा दंड नाशिककरांकडून लॉकडाउन काळात वसूल केला आहे.

नाशिक : लॉकडाउन काळात सर्रासपणे दुचाकी घेऊन रस्त्यांवर वावरणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार विविध कलमांतर्गत कारवाई करून पोलिसांनी ३ लाख ६३ हजार ४०० रुपयांचा दंड नाशिककरांकडून लॉकडाउन काळात वसूल केला आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना एकूण दंड १८ लाख ९० हजार १०० रुपये इतका करण्यात आला असून, त्यापैकी १५ लाख २६ हजार ७०० रुपयांची वसुली शिल्लक आहे.नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच दररोज संशयित रुग्णही उपचारार्थ रुग्णालयात दाखल होत आहेत. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा २७६ वर पोहोचला आहे. सर्वाधिक २५३ रुग्ण मालेगावमधील आहेत. तसेच शहरातदेखील ११ कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत.कोरोना आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीकरिता सकाळी १० ते दुपारी ४ अशी वेळ निर्धारित केली गेली आहे. शहर पोलिसांनी रस्त्यावर बॅरिकेड लावून कोणीही विनाकारण घराबाहेर पडणार नाही, याची खबरदारी घेतली आहे.२० एप्रिलपासून लॉकडाउनमध्ये काहीशी सूट काही ठराविक अस्थापनांना विविध नियम, अटींच्या अधीन राहून देण्यात आली आहे. त्याचा गैरफायदा सर्वसामान्य लोकांकडून घेतला जात आहे.पोलीस प्रशासनाकडून संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी, गस्त वाढविण्यात आली आहे. मात्र नागरिकांकडून आद्यपही फारसे गांभीर्याने घेतले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. १९ मार्चपासून अद्याप १ हजार ५३९ लोकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच ३ हजार ६७६ लोकांविरुद्ध भादंवि कलम १८८ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पोलीस आयुक्तांनी शहरात अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडताना मास्कचा वापर बंधनकारक केला आहे. मात्र बहुतांश लोक अद्यापही मास्कचा वापर करण्याकडे दुर्लक्ष करतात. या लोकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. अद्याप तब्बल ५८० लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.---------पावणे चार हजार लोकांवर गुन्हेलॉकडाउन लवकर संपवावा, असे प्रत्येकालाच वाटते; मात्र अपवाद वगळता प्रामाणिकपणे किती लोक आपापल्या घरातच थांबतात? विनाकारण रस्त्यांवर येण्याचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नाही. तरीदेखील अद्याप फारसे गांभीर्य नागरिकांत दिसून येत नाही. महिनाभरात लॉकडाउनला बाधा निर्माण करत जमावबंदी, संचारबंदी व आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करणाºया तब्बल ३ हजार ६७६ लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले गेले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक