शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

अपंगाना घरपोच धान्य देण्याचा नाशिक पॅटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 18:33 IST

सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गंत अनेक नवनवीन संकल्पना राबविल्या जात असून, त्याचाच भाग म्हणून अपंग व अतियश वयोवृद्ध असलेल्या शिधापत्रिकाधारकांना सार्वजनिक वितरणाचा लाभ देण्याची योजना सुरू करण्याचे ठरविण्यात आले आहे.

ठळक मुद्देपुरवठा खात्याचा निर्णय : ग्राहक दिनापासून सुरूवातअपंग शिधापत्रिकाधारकांची माहिती गोळा करण्याच्या सुचना

नाशिक : वयोवृद्ध व अपंग जे स्वस्त धान्य दुकानापर्यंत पोहोचू शकत नाही, अशा लाभार्थ्यांच्या घरी जाऊन धान्य वाटप करण्याचा नाशिक पॅटर्न जिल्हा पुरवठा विभागाने सुरू केला असून, त्याची सुरूवात अलिकडेच पार पडलेल्या जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्ताने करण्यात आली आहे. तालुक्याच्या तहसिलदारांनी रेशन दुकानदारांच्या माध्यमातून अपंग शिधापत्रिकाधारकांची माहिती गोळा करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गंत अनेक नवनवीन संकल्पना राबविल्या जात असून, त्याचाच भाग म्हणून अपंग व अतियश वयोवृद्ध असलेल्या शिधापत्रिकाधारकांना सार्वजनिक वितरणाचा लाभ देण्याची योजना सुरू करण्याचे ठरविण्यात आले आहे. शिधापत्रिकाधारकांना दरमहा रेशनमधून स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून दिले जात असले तरी, निराधार व अपंग असलेल्या शिधापत्रिकाधारकांना गावातील रेशन दुकानापर्यंत जाऊन धान्य घेणे दरमहा शक्य होत नाही, अशा वेळी त्यांच्या नावे असलेले धान्याचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता अन्न व पुरवठा मंत्रालयाने शिाधापत्रिकाधारकांना बायोमॅट्रीक पद्धतीने धान्य देण्याचा निर्णय घेतल्यामुळे थेट शिधापत्रिकाधारकाच्या दाराशी जावून रेशन दुकानदार धान्याचे वितरण करू शकत असल्याची बाब पुरवठा खात्याच्या निदर्शनास आली आहे. त्याची सुरूवात नाशिकपासून करण्याचे ठरविण्यात आले असून, हा पॅटर्न ‘नाशिक पॅटर्न’ म्हणून ओळखला जाऊ शकतो. जिल्ह्यातील अपंग जे रेशन दुकानापर्यंत पोहोचू शकत नाही अशांचा शोध घेऊन रेशन दुकानदाराने त्यांच्या घरी जाऊन महिन्याचे धान्य वितरण करण्याचे ठरविण्यात आले आहे. अर्थातच लाभार्थ्याच्या अपंगत्वाचा गैरफायदा रेशन दुकानदाराने उचलू नये यासाठी धान्य वाटप करताना त्याने परिसरातील नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ते वाटप करणे बंधनकारक करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात जागतिक ग्राहक दिनानिमित्त त्याची सुरूवात करण्यात आली असून, सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथील भागाबाई लक्ष्मण जाधव या ९० वर्षीय वृद्ध अपंग महिलेला सर्व प्रथम घरपोच धान्य वाटप करण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रिंप्री त्र्यंबक येथील श्रीमती सावित्रीबाई पालवे यांना तसेच खंबाळे येथील वयोवृद्ध निराधार व्यक्तीच्या घरी जाऊनही धान्याचे वाटप करण्यात आले आहे. जानेवारी महिन्यापासून जवळपास सर्वच अपंगाना घरपोच धान्य देण्याच्या सुचना पुरवठा खात्याने रेशन दुकानदारांना दिल्या आहेत.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक