शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक परिक्रमा मार्गाला मिळाला हिरवा कंदील; ७,९२२ कोटींच्या खर्चाला शासनाची मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 09:31 IST

नाशिकमध्ये २०२७ मध्ये कुंभमेळा होणार असून या कुंभमेळ्यासाठी  २ कोटी भाविक येण्याचा अंदाज  आहे.

मुंबई : आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि नाशिक शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी राज्य सरकारने ६६.१५ किमी लांबीच्या नाशिक परिक्रमा मार्ग प्रकल्पाला मान्यता दिली आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत (एमएसआयडीसी) हा महामार्ग विकसित केला जाणार असून त्यासाठी ७ हजार ९२२ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे.

नाशिकमध्ये २०२७ मध्ये कुंभमेळा होणार असून या कुंभमेळ्यासाठी  २ कोटी भाविक येण्याचा अंदाज  आहे. त्यातून पायाभूत सुविधांवर ताण येणार असून शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा परिक्रमा मार्ग हाती घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. प्रकल्पाच्या कामासाठी ३,६५९ कोटी रुपयांचा भूसंपादनाचा खर्च ‘नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणामार्फत’ केला जाणार आहे, तर प्रकल्पाच्या बांधकामासाठी ४,२६२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा खर्च केंद्राच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून करण्याचे विचाराधीन असून त्याचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.  मान्यता मिळताच  काम हाती घेतले जाणार आहे. 

असा असेल मार्गआडगाव-दिंडोरी रोड ढकांबे शिवारराष्ट्रीय महामार्ग ८४८- पेठगवळवाडी गंगापूर रोडगोवर्धन -त्र्यंबक महामार्गबेलगाव ढगानाशिक-मुंबई महामार्गविल्होळीराज्य मार्ग क्रमांक -६०सिन्नर फाटा व आडगाव

महामार्गाला टोल? या महामार्गाच्या उभारणीसाठी टोलवसुली आणि अंमलबजावणी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांच्याकडून खर्च केला जाणार आहे. टोल लावल्यास त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाची विभागणी  या दोन्ही यंत्रणांनी केलेल्या खर्चानुसार करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून मान्यता मिळाल्यानंतर  सामंजस्य करार केला जाणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Green Light for Nashik Parikrama Marg; ₹7,922 Crore Approved

Web Summary : Maharashtra approves the Nashik Parikrama Marg for Kumbh Mela 2027, aiming to ease traffic with a ₹7,922 crore investment. The 66.15 km highway project, managed by MSIDC, awaits central approval for construction costs, with land acquisition handled by the Kumbh Mela Authority. Tolls are proposed.
टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळा