शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटी एक्स्प्रेसच्या नवीन २१ बोगी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 21:28 IST

नाशिक : नाशिकच्या प्रवाशांची अत्यंत जिव्हाळ्याची पंचवटी एक्स्प्रेस नव्या रूपात प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली असून, पुढील आठवड्यात मनमाडहून नवीन बोगींसह पंचवटी एक्स्प्रेस धावणार आहे. या गाडीच्या बोगींमध्ये बदल करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे.

ठळक मुद्देकायापालट : गाडीची अंतर्गत रचनाही बदललीचेन्नई येथील ‘इंटिग्रल कोच फॅक्टरी’ येथे बांधणी

नाशिक : नाशिकच्या प्रवाशांची अत्यंत जिव्हाळ्याची पंचवटी एक्स्प्रेस नव्या रूपात प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली असून, पुढील आठवड्यात मनमाडहून नवीन बोगींसह पंचवटी एक्स्प्रेस धावणार आहे. या गाडीच्या बोगींमध्ये बदल करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे.नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी पंचवटी एक्स्प्रेस ही महत्त्वाची गाडी मानली जाते. मनमाड आणि नाशिकरोड स्थानकातून या गाडीने दररोज मुंबईला जाणाºया प्रवाशांची संख्या मोठी असते. पंचवटी एक्स्प्रेसला असलेल्या पासधारकांची बोगीदेखील भरगच्च असल्याने नियमित प्रवााशांची संख्या लक्षात येते. या गाडीत काही बदल करण्याची मागणी रेल परिषदेच्या वतीने करण्यात आली होती.१ नोव्हेंबर १९८५ पासून पंचवटी एक्स्प्रेस धावत आहे. मनमाड ते मुंबई हे २६१ किलोमीटरचे अंतर ही गाडी वेगात पार करते. आता ४२ वर्षांनंतर या गाडीला नवे रंगरूप मिळाले आहे. इंटरसिटीचा दर्जा असलेली पंचवटी एक्स्प्रेस आदर्श गाडी व्हावी यासाठी रेल परिषदेने उपक्रम आखला होता. त्यानुसार रेल्वे प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा केल्याने पंचवटी एक्स्प्रेसला २१ नवीन बोगी मिळाल्या आहेत. या गाडीसाठी तयार करण्यात आलेल्या नवीन बोगी चेन्नई येथील ‘इंटिग्रल कोच फॅक्टरी’ येथे बांधणी करण्यात आलेली आहे. या गाडीचे संपूर्ण नवीन कोच येवला येथे दाखल झाले आहेत. या बोगीचे अंतर-बाह्य रंग बदलण्यात आले असून स्वरूपातही बदल करण्यात आले आहेत.

टॅग्स :NashikनाशिकRailway Passengerरेल्वे प्रवासी