शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

अहमदनगरच्या उमेदवाराला नाशिकचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 00:43 IST

विधानपरिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघातून उमेदवार निश्चित करण्यावरून टीडीएफ (शिक्षक लोकशाही आघाडी)मधील मतभेद टोकाला गेले आहेत. नाशिक येथे उमेदवार निश्चित करण्यासाठी आयोजित टीडीएफ च्या मेळाव्यात अहमदनगरच्या उमेदवाराचे नाव पुढे आल्याने नाशिकच्या सदस्यांनी विरोध करीत मेळाव्यात गोंधळ घातला. त्यामुळे टीडीएफचा उमेदवार निश्चित करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला असून, येत्या चार ते पाच दिवसांत उमेदवार निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नाशिक : विधानपरिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघातून उमेदवार निश्चित करण्यावरून टीडीएफ (शिक्षक लोकशाही आघाडी)मधील मतभेद टोकाला गेले आहेत. नाशिक येथे उमेदवार निश्चित करण्यासाठी आयोजित टीडीएफ च्या मेळाव्यात अहमदनगरच्या उमेदवाराचे नाव पुढे आल्याने नाशिकच्या सदस्यांनी विरोध करीत मेळाव्यात गोंधळ घातला. त्यामुळे टीडीएफचा उमेदवार निश्चित करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला असून, येत्या चार ते पाच दिवसांत उमेदवार निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नाशिक येथील औरंगाबादरोडवरील सिद्धिविनायक लॉन्स येथे नाशिक विभागीय टीडीएफ तर्फे विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्याच्या उद्देशाने रविवारी (दि. २८) मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. परंतु या मेळाव्यात अहमदनगरच्या उमेदवाराचे नाव पुढे आल्याने नाशिकच्या मेळाव्यात नाशिकच्या उमेदवारांच्या समर्थकांनी अहमदनगरच्या उमेदवारांना जोरदार विरोध नोंदवत मेळाव्यात गोंधळ घातला. नाशिक विभागातून विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी नाशिकचे एस. बी. देशमुख, आर. डी. निकम, अहमदनगरचे भाऊसाहेब कचरे, राजेंद्र लांडे, आप्पासाहेब शिंदे, एस. डी. लगड, जळगावचे एस. डी. भिरु ड, धुळ्याचे निशांत रंधे, संगमनेरचे विठ्ठल पानसरे व मालेगावचे अजित लाठार आदी उमेदवार इच्छुक आहेत. त्यानुसार अहमदनगर, मालेगाव, धुळे येथे झालेल्या टीडीएफच्या मेळाव्यात संबंधित जिल्ह्णातून आपल्याच जिल्ह्णाला उमेदवारी मिळावी यासाठी आग्रह धरला गेला. परंतु नाशिकच्या मेळाव्यात अहमदनगरच्या उमेदवाराचे नाव पुढे आल्याने नाशिकचे इच्छुक उमेदवार एस. बी. देशमुख व आर. डी. निकम यांच्या समर्थकांनी मेळाव्यात गोंधळ घालत यावेळी नाशिकच्याच शिक्षकाला उमेदवारी मिळावी, अशी जोरदार मागणी केली. त्यामुळे उमेदवार निश्चित करण्याची प्र्रक्रिया लांबणीवर पडली असून, टीडीएफचा अधिकृत उमेदवार येत्या चार-पाच दिवसांत घोषित करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.बेडसे यांना विरोधशिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ)मध्ये उमेदवार निश्चितीवरून संदीप बेडसे यांच्या नावावरून मतभेद निर्माण झाले असून, शिक्षक मतदारसंघातून निवडून जाणारा उमेदवार शिक्षकच असवा, अशी मागणी करीत टीडीएफच्या एका गटाने जिल्हास्तरीय मेळावे घेऊन नाव निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यात गेल्या वेळी पराभवाचा सामना करावा लागलेल्या अहमदनगरचेच नाव पुढे येऊ लागल्याने नाशिकच्या शिक्षकांनी जोरदार विरोध केला. त्यामुळे मेळाव्यात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.छायाचित्र आर फोटोवर २८टीडीएफ 

टॅग्स :ElectionनिवडणूकTeacherशिक्षक