शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

हास्य कविसंमेलनात रसिक झाले लोटपोट नाशिक हिन्दी सभा : राजकीय, सामाजिक व्यंगाने नाशिककर अंतर्मुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 01:03 IST

नाशिक : ‘सुबह सुबह मै सब्जा मंडा गया, और दुकानदारसे कहा मेथा का सब्जा देदो, उसने कहा मेथा नही मेथी है, मैने कहा गोबा देदो, उसने कहा गोबा नही गोबी है, मैने कहा चलो भेंडा ही देदो.

ठळक मुद्दे कवितांनी नाशिककरांना मनमुराद हसविलेराजकारण आदी विविध विषयांवर कविता

नाशिक : ‘सुबह सुबह मै सब्जा मंडा गया, और दुकानदारसे कहा मेथा का सब्जा देदो, उसने कहा मेथा नही मेथी है, मैने कहा गोबा देदो, उसने कहा गोबा नही गोबी है, मैने कहा चलो भेंडा ही देदो.. ’ - अशा हास्यव्यंगाच्या कवितांनी नाशिककर श्रोत्यांना लोटपोट हसवले. निमित्त होते नाशिक हिंदी सभेतर्फे आयोजित अखिल भारतीय हिन्दी हास्य कविसंमेलनाचे. होळीच्या पार्श्वभूमीवर हिंदी सभेतर्फे दादासाहेब गायकवाड सभागृहात शुक्रवारी (दि. ९) आयोजित या कविसंमेलनात शशिकांत यादव (देवास), राजेंद्र मालवीय ‘आलसी’, शंभू शिखर (इटारसी), डॉ. भुवन मोहिनी (राजस्थान), सुदीप भोला (दिल्ली) व कपिल जैन (यवतमाळ) यांच्या विनोदी कवितांनी रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळवली. देशभरातील मूर्ती विटंबना, मोदी-अमित शहांचे संबंध, अण्णा आणि अरविंद केजरीवाल यांच्या भ्रष्टाचाराविरोधातील लढाईनंतरचे राजकारण आदी विविध विषयांवर हास्यकवींनी सादर केलेल्या कवितांनी नाशिककरांना मनमुराद हसविले. प्रारंभी अशोका बिल्डकॉनचे चेअरमन अशोक कटारिया व कारडा कन्स्ट्रक्शनचे नरेश कारडा आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. नाशिक हिंदी सभेचे संस्थापक गुलाब प्रसाद पांडे, ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल, सभेचे अध्यक्ष आर्कि. सुरेश गुप्ता, नेमीचंद पोद्दार, उपाध्यक्ष भरत सिंह, ताराचंद गुप्ता, यशवंत सिंह, एम. पी. मित्तल, ओमप्रकाश जाजू,सत्यप्रकाश गुप्ता आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. प्रास्ताविक ठाकूर भरत सिंह यांनी केले.स्त्रीकेंद्रित काव्याने वेधले लक्ष‘बेटी से चलते है दो कुल, बेटी ब्यूटिफू ल, वंडरफूल’ या सुदीप भोला यांच्या व ‘एक अधुरी कहानी तो मुझ में भी है, एक मीरा दिवानी तो मुझ में भी है’ या डॉ. भुवन मोहिनी यांच्या स्त्रीकेंद्रित कवितांनी उपस्थितांची दाद मिळविली. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर समाजाने स्त्रीला आई, मुलगी, बहीण, पत्नी, प्रेयसी अशा सर्व रूपांमध्ये सन्मान देण्याचे आवाहनही कवींनी आपल्या कवितांमधून केले.