शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक मनपा उभारणार रुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 00:31 IST

नाशिक : सध्या संसर्गजन्य आजारांमुळे निर्माण झालेली परिस्थिती बघता अशाप्रकारच्या आजारासाठी स्वतंत्र रुग्णालय बांधण्याची सूचना स्थायी समितीचे नूतन सभापती गणेश गिते यांन प्रशासनाला दिल्या आहेत.

नाशिक : सध्या संसर्गजन्य आजारांमुळे निर्माण झालेली परिस्थिती बघता अशाप्रकारच्या आजारासाठी स्वतंत्र रुग्णालय बांधण्याची सूचना स्थायी समितीचे नूतन सभापती गणेश गिते यांन प्रशासनाला दिल्या आहेत. यासंदर्भात तातडीने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही गिते यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गिते यांची समितीच्या सभापतिपदी बुधवारी (दि.८) निवड घोषित केली त्यानंतर गिते यांनी गुरुवारी (दि. ९) सभापतिपदाचा कार्यभार स्वीकारला.  यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, सभागृहनेते सतीश सोनवणे, गटनेता जगदीश पाटील, माजी महापौर रंजना भानसी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यानंतर गिते यांनी अधिकाऱ्यांची कोरोनाबाबत आढावा बैठक घेतली. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय, मनपाची अन्य रुग्णालये आणि तपोवन रुग्णालयात औषधांची ताजी स्थिती काय आहे हे तपासून घ्यावे आणि गरजेनुसार औषधे तसेच जंतुनाशके खरेदीसाठी अल्पमुदतीच्या निविदा मागवून घ्याव्यात, असेही गिते यांनी सांगितले. मनपाच्या वतीने वापरण्यात येणारी जंतुनाशके आणि अन्य बाबतीत आढावादेखील गिते यांनी घेतला. त्याचबरोबर विभागनिहाय आरोग्य तपासणी केंद्रे सुरू करून त्यानुसार नागरिकांची आरोग्य तपासणी करावी तसेच नागरिकांना वैद्यकीय उपचार करावेत, असेही गिते यांनी सांगितले. बैठकीस अतिरिक्त आयुक्त बी. जे. सोनकांबळे, शहर अभियंता संजय घुगे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र त्र्यंबके, आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे, सहायक आरोग्याधिकारी डॉ. सचिन हिरे, डॉ. कल्पना कुटे, डॉ. प्रशांत शेटे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक