Nashik Municipal Election Result 2026 : नाशिक महापालिका, पैलवानांचा बालेकिल्ला! ढिकले-महाजन यांच्या चर्चेचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 12:05 IST2026-01-20T12:04:44+5:302026-01-20T12:05:56+5:30

Nashik Municipal Election Result 2026 : कोणे एकेकाळी भूतपूर्व नाशिक नगरपालिकेवर पैलवान मंडळींचा पगडा असायचा, यंदा पैलवानांपेक्षा बाहू स्फुरण पावणारे अनेक जण निवडून आले आहेत.

Nashik Municipal Election Result 2026 Nashik Municipal Corporation stronghold of wrestlers! Video of Dhikle-Mahajan's off-the-record discussion goes viral | Nashik Municipal Election Result 2026 : नाशिक महापालिका, पैलवानांचा बालेकिल्ला! ढिकले-महाजन यांच्या चर्चेचा व्हिडीओ व्हायरल

Nashik Municipal Election Result 2026 : नाशिक महापालिका, पैलवानांचा बालेकिल्ला! ढिकले-महाजन यांच्या चर्चेचा व्हिडीओ व्हायरल

नाशिक: कोणे एकेकाळी भूतपूर्व नाशिक नगरपालिकेवर पैलवान मंडळींचा पगडा असायचा, यंदा पैलवानांपेक्षा बाहू स्फुरण पावणारे अनेक जण निवडून आले आहेत. त्यात सिडकोतील लक्षवेधी लढतीतील चर्चेत असलेले मुकेश शहाणे यांनी विजयानंतर दंड थोपटले तसेच पश्चिम नाशिकमध्येही शिंदेसेनेचे नगरसेवक समीर कांबळे निवडून आल्यानंतर त्यांचाही दंड थोपटून आव्हान देण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

एकाने तर नाशिक महापालिका पैलवानांचा बालेकिल्ला अशी पोस्ट टाकून या पैलवानांवर प्रतिक्रिया दिली आहे. नाशिकमध्ये अनेक पैलवान आताही राजकारणात आहेत. शाहू खैरे, आमदार सुहास कांदे, आमदार अॅड. राहुल ढिकलेदेखील पैलवान गडी आहेत, मात्र, यंदाच्या निवडणुकीत दंड थोपटताना भलतेच दिसले. अर्थातच त्यावर खूप मिम्स आणि प्रतिक्रिया पडत आहेत. अनेकांनी ही निवडणूक होती की कुस्ती असा प्रश्न केला आहे.

ढिकले-महाजन यांच्या ऑफ द रेकॉर्ड चर्चेचा व्हिडीओ व्हायरल

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्व महाजन आणि आमदार बिकले एकमेकांशी खासगीत बोलत असतानाचा आवाज वाहिन्यांच्या माईकने टिपला आहे. भाजप उमेदवार अजिंक्य साने हे निवडून येणे अवघड होते. मात्र, त्यांना वडाळा येथील एका कथित गुन्हेगाराने मदत केल्याची चर्चा असून, त्या व्यक्तीने आपण तिन्ही उमेदवार निवडून आणले नाही तर जेलमध्ये टाका, असे आशयाचे उभयतांमधील संभाषण व्हायरल झाले आहे.

Web Title : नासिक महानगरपालिका: पहलवानों का गढ़! ढिकले-महाजन चर्चा का वीडियो वायरल।

Web Summary : नासिक के हालिया चुनावों में बाहुबल का प्रदर्शन दिखा, जिससे मीम्स बने। ढिकले और महाजन का एक वीडियो सामने आया है जिसमें एक उम्मीदवार की जीत में कथित आपराधिक मदद पर चर्चा हो रही है।

Web Title : Nashik Municipal Corporation: Wrestlers' Stronghold! Dhikle-Mahajan discussion video goes viral.

Web Summary : Nashik witnessed flexing of muscles in recent elections, sparking memes. A video of Dhikle and Mahajan discussing a candidate's win with alleged criminal help has surfaced.