शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक महापालिकेच्या जीएसटी अनुदानात कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 14:56 IST

धक्का : मागील वर्षापेक्षाही कमी मिळणार निधी

ठळक मुद्देदरमहा देण्यात येणाऱ्या जीएसटी अनुदानात नवीन आर्थिक वर्षात आठ टक्के वाढ अपेक्षित मागील आर्थिक वर्षात ८८०.८० कोटी रुपये जीएसटी अनुदानातून प्राप्त झाले होते

नाशिक - महापालिकेला शासनामार्फत दरमहा देण्यात येणाऱ्या जीएसटी अनुदानात नवीन आर्थिक वर्षात आठ टक्के वाढ अपेक्षित असताना शासनाने मात्र एपिल २०१८ चे अनुदान ७२.८३ कोटी रुपये अदा केले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत अनुदानात दरमहा ६० लाख रुपयाने कपात होणार आहे. त्यामुळे, आयुक्तांनी अंदाजपत्रकात अपेक्षित धरलेली ९५१.२६ कोटी रकमेऐवजी ८७३.९६ कोटी रुपयेच महापालिकेच्या पदरात पडणार आहे. मागील आर्थिक वर्षात ८८०.८० कोटी रुपये जीएसटी अनुदानातून प्राप्त झाले होते. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात सुमारे ७७ कोटींचा फटका महापालिकेला बसण्याची शक्यता आहे.एलबीटी अनुदान रद्द झाल्यानंतर १ जुलै २०१७ पासून महापालिकेला दरमहा जीएसटीचे अनुदान न चुकता शासनाकडून प्राप्त होत आहे. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात महापालिकेला दरमहा ७३.४० कोटी रुपये प्राप्त झाले. मात्र, मार्च २०१८ मध्ये केवळ १९.७४ कोटी रुपयेच अदा करण्यात आले होते. मागील आर्थिक वर्षात महापालिकेच्या खात्यात ८८०.८० कोटी रुपये जीएसटी अनुदान जमा झाले होते. जीएसटी अनुदान देताना केंद्र व राज्य शासनाकडून दरवर्षी ८ टक्के वाढ दिली जाणार आहे. त्यानुसार, सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात महापालिकेला दरमहा ७९.२७ कोटी रुपये अनुदान अपेक्षित आहे. त्यानुसार, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर करताना त्यात आठ टक्के वाढ गृहित धरून ९५१.२६ कोटी रुपये प्राप्त होतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार, अंदाजपत्रकात विकास कामांसाठी तरतूद करण्यात आलेली आहे. नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर शासनाने माहे एप्रिल २०१८ चे जीएसटी अनुदान वितरित केले आहे. त्यात, नाशिक महापालिकेला ७२.८३ कोटी रुपये अनुदान अदा करण्यात आले आहे. मागील आर्थिक वर्षात महापालिकेला दरमहा ७३.४० कोटी रुपये अनुदान प्राप्त होत होते. मात्र, त्यात वाढ होण्याऐवजी ६० लाखाने अनुदान कमी करण्यात आले आहे. म्हणजेच, सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठीचे अंदाजित अनुदानाचा विचार करता महापालिकेला सुमारे ७७.०३ कोटीने अनुदान कमी मिळणार आहे. यापुढेही दरमहा ७२.८३ कोटीच प्राप्त होत राहिल्यास आयुक्तांच्या अंदाजपत्रकातील जमा-खर्चाची गणिते बिघडण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाGSTजीएसटी