शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक महापालिकेत उपआयुक्तांसह अधिका-यांचे खातेपालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 19:44 IST

फडोळ यांच्याकडील खाती काढली : लेखापरीक्षकाकडे प्रशासनाचा भार

ठळक मुद्देप्रशासन उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांच्याकडे महिला बालकल्याणसह अन्य खाती कार्यकारी अभियंता संजय घुगे यांच्याकडे दोरकुळकर यांच्याकडील गोदावरी संवर्धन कक्षाचा अतिरिक्त कार्यभार

नाशिक - महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रशासकीय सोयीचा भाग म्हणून उपआयुक्त दर्जाच्या अधिका-यांचे खातेपालट केले असून मुख्य लेखापरीक्षक महेश बच्छाव यांच्याकडे प्रशासनाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. प्रशासन उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांच्याकडे महिला बालकल्याणसह अन्य खाती देण्यात आली आहेत.आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी (दि.२१) सहा अधिका-यांकडील खातेपालटासंबंधीचे आदेश जारी केले. त्यानुसार, प्रशासन उपआयुक्तपदाचा कार्यभार सांभाळणारे हरिभाऊ फडोळ यांच्याकडून प्रशासन काढून घेत त्यांच्याकडे महिला व बालकल्याण विभाग, निवडणूक शाखा, अपंग कल्याण, कामगार कल्याण, माहिती अधिकारी आदी विभागांचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. फडोळ यांच्याकडील प्रशासनाचा कार्यभार मुख्य लेखा परीक्षक महेश बच्छाव यांच्याकडे अतिरिक्त म्हणून देण्यात आला आहे. फडोळ यांच्याकडील हॉकर्स झोनसंदर्भातील विभाग उपआयुक्त रोहिदास बहिरम यांच्याकडे सोपविण्यात आला असून बहिरम यांच्याकडील अतिक्रमण विभाग कायम ठेवण्यात आला आहे. उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांच्याकडील महिला बालकल्याण विभाग काढून घेत त्यांच्याकडे विविध करसह एलबीटीचा विभाग सोपविण्यात आला आहे. भुयारी गटार योजनेचे कार्यकारी अभियंता संजय घुगे यांच्याकडे दोरकुळकर यांच्याकडील गोदावरी संवर्धन कक्षाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला असून सहाय्यक आयुक्त आर. आर. गोसावी यांच्याकडे फडोळ यांच्याकडील समन्वयकाचा कार्यभार देण्यात आला आहे.प्रशासकीय सोयीनुसार बदल्याप्रशासकीय सोयीचा भाग म्हणून सदर बदल्या करण्यात आल्या आहेत. मुख्य लेखापरीक्षकाकडे प्रशासनाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. असा कार्यभार देण्याचा अधिकार आयुक्तांना आहे. त्यात चुकीचे काहीच नाही.- तुकाराम मुंढे, आयुक्त, मनपा

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाTransferबदली