शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक महापालिकेतील पाच कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 01:25 IST

महापालिकेतील घरपट्टी वसुली विभागातील दोघा कर्मचाºयांना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल तर आरोग्य विभागातील गैरहजर कर्मचाºयाची हजेरी लावणाºया स्वच्छता निरीक्षक, मुकादमासह गैरहजर महिला कर्मचाºयाला निलंबित करण्याचे आदेश प्रशासनाने काढले आहे.

नाशिक : महापालिकेतील घरपट्टी वसुली विभागातील दोघा कर्मचाºयांना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल तर आरोग्य विभागातील गैरहजर कर्मचाºयाची हजेरी लावणाºया स्वच्छता निरीक्षक, मुकादमासह गैरहजर महिला कर्मचाºयाला निलंबित करण्याचे आदेश प्रशासनाने काढले आहे.  आरोग्य विभागातील तीनही कर्मचाºयांवर तर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रशासनास दिले आहेत. त्यामुळे, कामचुकार आणि महापालिकेची फसवणूक करणाºया कर्मचाºयांचे धाबे दणाणले आहे.  महा-पालिकेच्या घरपट्टी विभागातील नाशिककरोड येथील विभागीय कार्यालयातील वरिष्ठ लिपिक विनायक मोहन साळवे आणि सातपूर विभागीय कार्यालयातील कनिष्ठ लिपिक सागर रघुनाथ साळवी यांना प्रशासनाने निलंबित केले आहे. सदर दोन्ही कर्मचाºयांवर घरपट्टी वसुली कामकाजात कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप आहे. घरपट्टीच्या बिलांचे वाटप न करणे, विभागीय अधिकाºयांनी दिलेल्या सूचनांचे पालन न करणे, वरिष्ठ अधिकाºयांशी गैरवर्तुणक  या बाबी उपआयुक्तांच्या निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाकडे त्यांच्यावर निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.त्यानुसार, आयुक्तांनी या दोघा कर्मचाºयांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. याचबरोबर, आरोग्य विभागातील तिघा कर्मचाºयांनाही निलंबित करण्यात आले आहेत. अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांनी नाशिकरोड येथील हजेरी शेडवर अचानक भेट देऊन पाहणी केली असता तेथे कार्यरत असलेले स्वच्छता निरीक्षक एकनाथ ताठे व मुकादम युवराज जाधव यांनी हजेरी शेडवरील सफाई कर्मचारी कामावर हजर नसताना त्यांची हजेरी लावल्याचे निदर्शनास आले.  तसेच श्रीमती वैशाली ताठे या सफाई कामगार कामावर हजर आढळून आल्या नाहीत. त्यामुळे, आरोग्य विभागाच्या अहवालानंतर या तीनही कर्मचाºयांना निलंबित करण्याचे आदेश काढण्यात आले.  याशिवाय, आरोग्य विभागातील या तीनही कर्मचाºयांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचेही आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रशासनाला दिले आहेत.अचानक भेटी देणारसफाई कामगारांच्या हजेरी शेडवर अधिकारी कधीही केव्हाही अचानक भेटी देऊन पाहणी करणार आहेत. याचवेळी, नेमून दिलेल्या भागात वेळेत साफसफाई झाली नसल्याचे निदर्शनास आल्यास, प्रत्यक्षात कामावर हजर नसल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्याबरोबरच फौजदारी गुन्हेही दाखल केले जाणार आहेत. सोमवारी (दि.१२) आयुक्तांनी केलेल्या या कारवाईमुळे कामचुकार कर्मचाºयांचे धाबे दणाणले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका