शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठत कडकडीत बंद ; रस्त्यांवर शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 17:13 IST

कोरोना संसर्गाचा धोका पुन्हा वाढू लागल्याने प्रशासनाने खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता शाळा महाविद्यालयांसबतच अन्य सर्व दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाच्या आदेशाला शहरासह उपनगरांमधूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये शनिवारी (दि.१३) कडकडीत बंद पाळण्यात आला.

ठळक मुद्दे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयी जनजागृतीखबरदारीची उपाययोजना ; अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद बाजारपेठ बंद असल्याने शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट

नाशिक : शहरासह राज्यातील विविध भागात कोरोना संसर्गाचा धोका पुन्हा वाढू लागल्याने प्रशासनाने खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता शाळा महाविद्यालयांसबतच अन्य सर्व दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाच्या आदेशाला शहरासह उपनगरांमधूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये शनिवारी (दि.१३) कडकडीत बंद पाळण्यात आला.कोरोनाचा वाढता प्रभाव नियंत्रित करण्यासाठी शनिवारी(दि.१३) व रविवारी (दि.१४) अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व दुकाने व व्यावासायिक आस्थापना पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शनिवारी (दि.१३) शहरातील शहरातील शालीमार, मेनरोड, दहीपूल, रविवार कारंजा, अशोकस्तंभ, कॉलेजरोड, गंगापूररोड परिसरातील इलेक्ट्रीक, कपडे, सौदर्य प्रसाधने यासारखी व्यावसायिक दुकाने व मॉल्स पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती.

किराणा दुकानांसह डेअरी उत्पादने,  भाजी विक्रेते, फळ विक्रेते व खानपानाचे हॉटेल, उपहारगृह वेळेचे निर्बंध पाळून सुरू असल्याचे दिसून आले. मात्र, यात काही प्रवाशी स्थानकांच्या परिसरातील चहा व वडापावचे स्टॉल सुरू असल्याने याठिकाणी ग्राहकांची वर्दळ दिसून आले. दरम्यान, प्रशासनाच्या आदेशाला शहरातील मेनरोड, दहीपूल, रविवार कारंडा, शालीमार, कॉलेजरोड, गंगापूररोड परिसरासह पंचवटी,गंगापूर, सातपूर, अंबड, सिडको, गोविंदनगर, इंदिरानगर, मुंबईनाका, द्वारका ,उपनगरसह नाशिकरोड व देवळाली भागातील व्यावसायिकांनी प्रतिसाद दुकाने बंद ठेवली होती.

मास्कशिवाय वावरकोरोनाचे संकट वाढत असताना एकीकडे प्रशासनाकडून शहरासह जिल्हाभरात कडक कोरोना प्रतिबंधात्मक नियम लागू करण्यात आले आहे. तर दुसरीकडे शहरातच एमजी रोड. मेनरोड सह अन्य काही भागांमध्ये तरुण मंडळी विनामास्क फिरताना, कट्यांवर गप्पा मारताना, दिसून आले. शहरातीतल रस्त्यांवरही अनेक दुचाकी चालकांनी हेल्मेट अथवा मास्कचा वापर केला नसल्याचे चित्र पाहायला मिळाले.

आरोग्य विभागाकडून जनजागृतीकोरोना संसर्ग वाढल्याने नागरिकांनी विनाकारण घराबाहेर करू नये तसेच शनिवार व रविवारच्या दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यावसायिकांनी दुकाने उघडू नये अन्यथा कारवाई केली जाईल अशा सूचना महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून फिरत्या वाहनांमधून करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे घंटागाडी व निर्जंतुकीकरणासाठी फिरणाऱ्या वाहनांमधूनही कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयी जनजागृती करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे शहरातील सीबीएस, मेहर सिग्नल भागात ध्वनीक्षेपकांद्वारे कोरोना प्रतिबंधात्कम खबरदारी घेण्याविषयी सुचना करण्यात येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिकcollectorजिल्हाधिकारीMarketबाजारbusinessव्यवसाय