शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक महापालिकेच्या  ठेवी ६०० कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 00:14 IST

महापालिकेचे उत्पन्न सुमारे १३०० कोटी रुपयांच्या आसपास असतानाच विविध बॅँकांमध्ये सुमारे ६०० कोटींवर मुदतठेवी जाऊन पोहोचल्या असून, त्यातून वार्षिक ४० कोटी रुपये व्याजापोटी पालिकेला प्राप्त होणार आहेत. दरम्यान, सिंहस्थ कामांसाठी २६० कोटी रुपये कर्ज मंजूर असून, सुमारे ७० कोटी रुपयांची देयके बाकी आहेत.

नाशिक : महापालिकेचे उत्पन्न सुमारे १३०० कोटी रुपयांच्या आसपास असतानाच विविध बॅँकांमध्ये सुमारे ६०० कोटींवर मुदतठेवी जाऊन पोहोचल्या असून, त्यातून वार्षिक ४० कोटी रुपये व्याजापोटी पालिकेला प्राप्त होणार आहेत. दरम्यान, सिंहस्थ कामांसाठी २६० कोटी रुपये कर्ज मंजूर असून, सुमारे ७० कोटी रुपयांची देयके बाकी आहेत. महापालिकेने आतापर्यंत मंजूर कर्जातून ९५ कोटी रुपयांची उचल केलेली आहे. उर्वरित कर्जाची उचल करण्याचा अद्याप विचार नसल्याचा दावा प्रशासकीय सूत्रांनी केला आहे.  नाशिक महापालिकेने आतापर्यंत विविध १५ शीर्षाखाली सुमारे ५५७.७७ कोटींच्या १२५ मुदतठेवी विविध राष्टÑीयीकृत बॅँकांमध्ये ठेवल्या आहेत. या ठेवींच्या माध्यमातून महापालिकेला सन २०१८-१९ या आर्थिक वार्षिक ४०.६४ कोटी रुपये व्याजापोटी प्राप्त होणार असल्याने ठेवीची रक्कम ६०० कोटींवर जाणार आहे. महापालिकेची सांपत्तिक स्थिती अशी बऱ्यापैकी असतानाच प्रलंबित सिंहस्थ कामांसाठी १०० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर कर्जातून उचलण्याची तयारी प्रशासनाने चालविल्याची चर्चा सुरू झाली. परंतु, अशा प्रकारचे कोणतेही कर्ज उचलण्याचा अद्याप विचार झाला नसल्याचे स्पष्टीकरण प्रशासकीय सूत्रांनी दिले आहे. सिंहस्थ कुंभमेळा काळात महापालिकेला २६० कोटी रुपये कर्ज उचलण्याची परवानगी शासनाने दिली होती. त्यानुसार, महापालिकेने आतापर्यंत त्यातील अवघे ९५ कोटी रुपये कर्जाची उचल केलेली आहे.गेल्या दोन वर्षांपासून अजूनही काही सिंहस्थविषयक कामे प्रलंबित आहेत. त्यासाठी महापालिकेला ७० कोटी रुपयांची देयके अदा करायची आहेत. त्यामुळे सिंहस्थ कामांसाठीच मंजूर असलेल्या कर्जातून शंभर कोटी रुपयांची उचल करण्याचा विचार पुढे आल्याचे समजते. परंतु, प्रशासकीय सूत्रांनी त्याबाबत इन्कार केला  आहे.  दरम्यान, मुदत संपूनही प्रलंबित राहिलेल्या सिंहस्थ कामांचा खातेनिहाय आढावा घेण्याचे आदेश प्रशासनाने विभागप्रमुखांना दिल्याचे वृत्त असून, मुदत संपलेली कामेच रद्द करत कंत्राटदारांना दणका देण्याचाही विचार असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका