शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

नाशिक महापालिकेत पाच स्वीकृत सदस्यांची अखेर नियुक्ती घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 16:07 IST

नऊ महिन्यांनंतर मुहूर्त : भाजपाचे तीन, सेनेचे दोन सदस्य नियुक्त

ठळक मुद्देभाजपात सदस्यांच्या नावावर एकमत होत नव्हते. त्यामुळे, नियुक्ती प्रक्रिया रखडली होतीभाजपात तीन स्वीकृत सदस्यत्वासाठी सुमारे दीडशेहून अधिक इच्छुक असल्याने पक्षाची पंचाईत झाली होती

नाशिक - गेल्या नऊ महिन्यांपासून महापालिकेत नियुक्त करावयाच्या स्वीकृत सदस्यत्वाची हंडी अखेर सोमवारी (दि.२०) फुटली. महापौर रंजना भानसी यांनी महासभेत भाजपाचे तीन तर शिवसेनेच्या दोन सदस्यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून घोषणा केली. शिवसेनेने दीड महिन्यांपूर्वीच आपल्या सदस्यांची नावे नगरसचिव विभागाकडे दिलेली होती तर भाजपात मात्र, सदस्यांच्या नावावर एकमत होत नव्हते. त्यामुळे, नियुक्ती प्रक्रिया रखडली होती. अखेर, नऊ महिन्यांनंतर स्वीकृतच्या नियुक्तीला मुहूर्त लागला.महासभेत महापौर रंजना भानसी यांनी भाजपाचे शहर सरचिटणीस प्रशांत गोरख जाधव, भाजयुमाचे शहराध्यक्ष अजिंक्य विजय साने आणि नाशिकरोड भाजपा मंडलाचे अध्यक्ष बाजीराव लहानू भागवत तर शिवसेनेचे कार्यालयीन कर्मचारी सुनील गोडसे आणि महिला आघाडीच्या शहराध्यक्ष अ‍ॅड. श्यामला दीक्षित यांच्या नावाची स्वीकृत सदस्य म्हणून घोषणा केली. या नियुक्त सदस्यांचा महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महापालिका निवडणुकीत भाजपाने ६६ जागा जिंकत सत्ता संपादन केली. निवडणुकीनंतर महिनाभरात स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होणे अपेक्षित होते. पक्षीय तौलनिक संख्याबळानुसार, भाजपाचे तीन तर शिवसेनेचे दोन सदस्य स्वीकृत म्हणून नियुक्त करायचे होते. मात्र, भाजपात तीन स्वीकृत सदस्यत्वासाठी सुमारे दीडशेहून अधिक इच्छुक असल्याने पक्षाची पंचाईत झाली होती. निवडणुकीत तिकिट वाटपावेळी भाजपा नेत्यांकडून अनेकांना स्वीकृतचे गाजर दाखवत उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घ्यायला लावण्यात आली होती. त्यामुळे, स्वीकृतसाठी मोठ्या प्रमाणावर चुरस निर्माण झाली होती. भाजपात घोळ सुरू असतानाच दीड महिन्यांपूर्वी, शिवसेनेने मात्र, सुनील गोडसे आणि अ‍ॅड. श्यामला दीक्षित यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत त्यांचे नामनिर्देशनपत्र नगरसचिव विभागाला सादर केले होते. त्यामुळे भाजपावर आयुक्तांकडूनही नावे सादर करण्यासाठी दबाव वाढलेला होता. अखेर, प्रशांत जाधव, माजी नगरसेवक विजय साने यांचे सुपुत्र अजिंक्य साने आणि बाजीराव भागवत या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. स्वीकृतसाठी भाजपात संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते शरद कुलकर्णी, नीलेश बोरा, माजी नगरसेवक लक्ष्मण सावजी, सुजाता करजगीकर, भारती बागूल, पुष्पा शर्मा यांचीही नावे चर्चेत होती तर रिपाइंचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्याही नावाची चर्चा घडवून आणली गेली. अखेर, सुरुवातीपासून शर्यतीत कायम असलेल्या तिघांची नियुक्ती करण्यात आली आहे.महिला कार्यकर्त्यांत नाराजीस्वीकृत सदस्यत्वासाठी शिवसेनेने महिला कार्यकर्त्याला संधी दिली असताना भाजपातही एका महिलेला प्रतिनिधीत्व दिले जाईल, अशी अटकळ बांधली जात होती. त्यामुळे भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या आणि पक्षाच्या प्रत्येक आंदोलनात सक्रीय  सुजाता करजगीकर व भारती बागूल यांच्या नावाची चर्चा होत होती. परंतु, भाजपाने महिलांना संधी न दिल्याने इच्छूक महिला कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. दीर्घकाळ पक्षात राहूनही न्याय न मिळाल्याने नाराजीची भावना इच्छुक महिलांनी बोलून दाखवली तर काही इच्छुकांनी अजूनही आपल्याला पक्षाकडून न्यायाची अपेक्षा असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाNashikनाशिक