शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या सायकल वारीत प्रदूषण मुक्तीचा संदेश, 500 सायकलस्वारांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 11:10 IST

आषाढी वारीनिमित्त पंढरीच्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी नाशिकहून प्रदूषणमुक्ती, प्लास्टिक बंदी, पर्यावरण पूरक संदेश व निरोगी आरोग्याचा संदेश घेऊन निघालेले 500 सायकल स्वार उच्चशिक्षित विविध क्षेत्रातील वारकऱ्यांची दिंडी आगळा वेगळा संदेश देत आज शेवटचा मुक्काम संपवून टेंभुर्णी - पंढरपूर मार्गावरून जाताना करकंब येथे विसावा घेऊन पंढरपूरकडे रवाना झाली आहे.

करकंब - आषाढी वारीनिमित्त पंढरीच्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी नाशिकहून प्रदूषणमुक्ती, प्लास्टिक बंदी, पर्यावरण पूरक संदेश व निरोगी आरोग्याचा संदेश घेऊन निघालेले 500 सायकल स्वार उच्चशिक्षित विविध क्षेत्रातील वारकऱ्यांची दिंडी आगळा वेगळा संदेश देत आज शेवटचा मुक्काम संपवून टेंभुर्णी - पंढरपूर मार्गावरून जाताना करकंब येथे विसावा घेऊन पंढरपूरकडे रवाना झाली आहे. आषाढी सोहळ्यानिमित्त पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी लाखो वारकरी विविध पालखी सोहळे व दिंड्याच्या माध्यमातून पायी चालत पंढरपूरला येतात परंतु नाशिक येथील नाशिक सायकलिस्ट ग्रुपच्या वतीने मागील सात वर्षापासून आगळा वेगळा उपक्रम राबवत कोणत्याही प्लास्टिकचा न वापर करता, रस्त्यांमध्ये विविध ठिकाणी एक हजार वृक्षारोपण करून व इंधन बचत करीत नाशिक ते पंढरपूर सायकलवरून चार दिवसात 360 की मी चे अंतर पार करीत पंढरपूरला येतात.

यामध्ये उद्योगपती, व्यावसायिक,नोकरवर्ग आहेत शिवाय यात 100 महिलांचा समावेश असून लहान मुले व 70 वर्षापर्यंतचे जेष्ठ नागरिक यांचाही सहभागी आहे.सोलार रथामध्ये विठ्ठलाची मूर्ती ठेऊन हा रथ सायकलवारीत इंधन बचतीचा संदेश देत होता. दिव्यांग व्यक्तीही या वारीत सहभागी होऊन दोन पँडलच्या सायकलवरून आपली पंढरीची वारी करीत आहे. तसेच सर्व सायकल स्वरांची जेवणाची व्यवस्था ही स्वतः सायकल स्वरांनी केली होती. पर्यावरणामध्ये वाढते प्रदूषण व इंधन बचत व निरोगी आरोग्यासाठी उत्तम व्यायाम याची सांगड घालून विठुरायाच्या नामस्मरणात आज आम्ही सायकल वारी ही संकल्पना घेऊन मागील सात वर्षा पासून या निमित्ताने आषाढी वारी करीत आहे. - हरिष बैजल, सायकल वारीचे संकल्पक