शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक मर्चंट बॅँक:   मतदारांचा निरुत्साह; पोलिसांचा उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 01:13 IST

नाशिक मर्चंट को आॅप. बॅँकेच्या निवडणुकीत मतदारांचा निरुत्साह असला तरी पोलिसांचा उत्साह मात्र दांडगा होता. शिवाजी उद्यानासमोरील बाजूस दीपसन्स कॉर्नरकडून सारडा शाळेकडे जाण्यास प्रतिबंध होता.

नाशिक : नाशिक मर्चंट को आॅप. बॅँकेच्या निवडणुकीत मतदारांचा निरुत्साह असला तरी पोलिसांचा उत्साह मात्र दांडगा होता. शिवाजी उद्यानासमोरील बाजूस दीपसन्स कॉर्नरकडून सारडा शाळेकडे जाण्यास प्रतिबंध होता. तसेच दीपसन्स समोरदेखील बॅरिकेड टाकून रस्ता बंद होता. त्यामुळे नागरिकांचे हाल झालेच, परंतु मतदान केंद्रासमोर कोणी उभे राहिले तरी त्यांना पळवून लावले जात होते. मतदान केंद्राच्या प्रतिनिधींनाही दूर करण्यात आल्याने सर्वच पॅनलच्या उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली.सदरची निवडणूक ही केवळ एका बॅँंकेची असली तरी पोलीस यंत्रणेने याठिकाणी लोकसभा किंवा महापालिका निवडणुकीसारखे स्वरूप दाखवून निर्बंध घातले होते. सागरमल मोदी शाळेतील मतदान केंद्रांवर सुमारे सहा हजार मतदान होते. शहरातील मध्यवर्ती भागाचे मतदान या भागातील असल्याने सर्वच उमेदवारांचे त्याकडे लक्ष होते. तथापि, पोलिसांनी सार्वत्रिक निवडणुकीपेक्षा अधिक नियम करीत मतदान केंद्रे दूरवर उभारण्यास लावली. दीपसन्स ते सारडा शाळेच्या दरम्यान रस्त्यावर कोणालाही येण्यास मनाई केली होती. कोणी मतदार आल्यानंतर उमेदवारांना त्यांच्याशी बोलू दिले जात नव्हते.शिवाजीरोडच्या वाहतुकीला पोलिसांच्या निर्बंधाचा फटका बसला. शिवाजी गार्डन ते शालिमार चौकदरम्यान एकाच रस्यावरून दुहेरी वाहतूक सुरू केल्याने वाहतूक संथगतीने सुरू होती तसेच कोंडीही होत होती. शिवाय दुकानदारांनादेखील त्याचा फटका बसला. मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांच्या दुचाकी किंवा मोटारी लावण्यासही जागा नव्हती. त्यामुळे त्यांना जागेचा शोध घ्यावा लागत होता. एकूणच पोलिसांनी अतिदक्षता घेतल्याने नागरिकांसह सायंकाळपर्यंत सर्वांचीच गैरसोय झाली.असाच प्रकार गोरेराम लेनमध्येही घडला. गोरेराम लेनमधील शाळेत असलेल्या केंद्रासाठी मातोश्री मंगल कार्यालयाजवळ बॅरिकेड उभारण्यात आल्याने तेथून पोलिसांनी दुचाकीही आतमध्ये येऊ दिली नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांचे हाल झाले. दरम्यान, याचठिकाणी उमेदवार तसेच कार्यकर्त्यांच्या मोटारी उभ्या असल्याने अन्य खासगी वाहने मध्ये सोडण्यात आली नाही. त्यामुळे वयोवृद्ध सभासद मतदारांना मतदान केंद्रापर्यंतदेखील जाता आले नाही.अखेरच्या क्षणापर्यंत प्रचार, मतदारांची वाहतूकही...सहकार क्षेत्रातील या बॅँकेच्या निवडणुकीत अन्य सार्वत्रिक निवडणुकांप्रमाणे आचारसंहिता नसल्याने बॅँकेची निवडणूक संपेपर्यंत प्रचार सुरू होता. विशेषत: मोबाइलवरून एसएमएस त्याचप्रमाणे मतदारांना मतदान केले नसेल तर तत्काळ मतदान करा, असे संदेश दिले जात होते. विशेष म्हणजे एकाच घरातील अनेक जण मतदार असेल तर उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोटारीतून मतदारांची वाहतूक सुरूच ठेवली होती. त्यामुळे सार्वत्रिक निवडणुकीचा प्रत्यय येत होता.दोन दिवस लागणार मतमोजणीलासुमारे पावणे दोन लाख मतदार व ८२ उमेदवार रिंगणात असलेल्या मर्चंट बॅँकेच्या निवडणुकीसाठी रविवारी सायंकाळी पाच वाजता मतदान संपुष्टात येऊन सर्वच उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी सायंकाळनंतर गाव व मतदान केंद्रनिहाय झालेल्या मतदानाची आकडेवारी गोळा करून विजयाचे गणित मांडण्यास सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत मतपेट्या पोलीस बंदोबस्तात नाशिक मुक्कामी आणण्यात आल्या.बुधवारी सकाळपासून या निवडणुकीच्या मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. मतपत्रिका असल्यामुळे व उमेदवारांची संख्या अधिक असल्यामुळे प्रारंभी सर्व मतपेट्यांमध्ये झालेले मतदान व त्यावर मतदान प्रतिनिधींनी केलेल्या स्वाक्षरीनिहाय तंतोतंत जुळते की नाही याची खात्री केली जाईल व त्यानंतर सर्व मतपेटीतील मतदान एकत्र करून त्याचे प्रत्येक २५ मतपत्रिकानिहाय गठ्ठे केले जातील.या गठ्ठ्यानंतर त्यातील वैध-अवैध मतपत्रिका वेगळ्या करून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात केली जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सायंकाळपर्यंत मतमोजणीचा हा पहिला टप्पा पूर्ण करण्यात येईल व त्यानंतरच प्रत्यक्ष मतमोजणी केली जाईल.मतदानाची टक्केवारी पाहता गुरुवारी दुपारनंतर निवडणुकीचा कल हळूहळू बाहेर पडेल. त्यामुळे निवडणुकीचे चित्र शुक्रवारी स्पष्ट होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना पाच दिवसांची प्रतिक्षा करावी लागेल.

टॅग्स :ElectionनिवडणूकbankबँकNashikनाशिक