शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

नाशिक बाजार समिती कर्जबाजारीच

By admin | Updated: November 25, 2015 23:27 IST

शिवाजी चुंभळे : सामोपचार परतफेड योजना रद्द

नाशिक : महाराष्ट्र राज्य सहकारी बॅँकेने कर्ज परतफेडीसाठी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीला दिलेली ‘सामोपचार परतफेड’ ही सवलत योजना बाजार समितीने मुदतीत रकमेचा भरणा न केल्याने रद्दबातल ठरविली आहे. त्यामुळे बाजार समितीला संपूर्ण कर्ज व्याजासह भरावे लागणार असून, समिती कर्जमुक्तीचा दावा फोल ठरला असल्याचे समितीचे संचालक शिवाजी चुंभळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.चुंभळे यांनी म्हटले आहे की, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर राज्य सहकारी बॅँकेची कोट्यवधी रुपयांची कर्जाची थकबाकी होती. सदर थकबाकी एकरकमी भरण्यासाठी सन २०१२ मध्ये सामोपचार परतफेड योजनेअंतर्गत समितीला सवलत देण्यात आली आणि एकरकमी सुमारे ४४ कोटी रुपये माफ करण्यात आले. उर्वरित ७७ कोटी रुपये कर्ज दोन महिन्यांच्या आत भरण्याची मुदत देण्यात आली होती. प्रत्यक्षात मूळ कर्ज हे ५२ कोटी रुपयांचे होते. परंतु ते मुदतीत न भरल्याने व चुकीच्या नियोजनामुळे ते १२१ कोटी रुपयांवर जाऊन पोहोचले. राज्य सहकारी बॅँकेने सवलत देऊनही बाजार समितीने कर्जाची थकबाकी भरण्याबाबत कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. अखेर दि. ७ नोव्हेंबर २०१५ रोजी बॅँकेने समितीचा पत्र पाठवून सदरची सवलत योजना रद्द करण्यात आल्याचे कळविले आहे आणि योजनेपूर्वीची मूळ कर्जबाकी व त्यापुढील कालावधीचे व्याज विचारात घेऊन उर्वरित रकमा भरण्याचे आदेशित केले आहे. सदर पत्र समितीला प्राप्त होऊनही सभापतींनी त्याची माहिती संचालक मंडळाला दिलेली नाही. सभापतींनी नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत समिती कर्जमुक्त केल्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात समिती कर्जमुक्त नव्हे तर कर्जबाजारीच असल्याचे उघडकीस आल्याचेही चुंभळे यांनी म्हटले आहे. दरम्यान, बाजार समितीतील कथित गैरव्यवहारांवरही चुंभळे यांनी आपल्या पत्रकात प्रकाश टाकला असून, भाजपा सरकारमधील विद्यमान मंत्री व पदाधिकारीही भ्रष्टाचाराला वाचा फोडण्याऐवजी त्यावर पांघरूण घालण्याचा प्रयन करत असल्याचा आरोपही चुंभळे यांनी केला आहे. (प्रतिनिधी)