शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

नाशिक लोकसभा निवडणूक निकाल 2019: हेमंत गोडसे यांचा २ लाख ९२ हजाराने दणदणीत विजय; भुजबळ यांचा दारूण पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 01:02 IST

मतमोजणीच्या २७ फे-या पुर्ण झाल्या आहेत. निकालाची आकडेवारी बघता गोडसे यांनी विक्रम केला असून प्रचंड मताधिक्याने आघाडी घेत भुजबळ यांना तब्बल २ लाख ९२ हजार २०४ मतांनी मागे टाकले आहे.

ठळक मुद्देनाशिकमध्ये दुस-यांदा खासदार रिपिट होण्याचा विक्रम झाला दाच्या निवडणुकीत ५९ टक्के मतदान झालंय. मागील लोकसभेत गोडसे यांनी भुजबळ यांचा १ लाख ८७ हजार ३३६ मतांनी पराभव केला होता.

नाशिक : प्रत्येक लोकसभा निवडणुकीत परिवर्तन घडविणाऱ्या नाशिक लोकसभा मतदारसंघात यंदा शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे व राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्यातच खरी लढत आहे. अपवाद वगळता या मतदारसंघात एकदा निवडून दिलेला खासदार पुन्हा निवडून येत नाही. गेल्या निवडणुकीत छगन भुजबळ यांचा पराभव करून हेमंत गोडसे हे मोदी लाटेवर विराजमान झाले होते. त्यामुळे गोडसे यंदा विक्र म करतात की समीर भुजबळ, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले होते; मात्र मतमोजणीच्या २७ फे-या पुर्ण झाल्या आहेत. निकालाची आकडेवारी बघता गोडसे यांनी विक्रम केला असून प्रचंड मताधिक्याने आघाडी घेत भुजबळ यांना तब्बल २ लाख ९२ हजार २०४ मतांनी मागे टाकले आहे. गोडसे यांनी विजयाचा जल्लोष साजरा क रण्यास सुरूवात केली असून शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापुढे कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण करण्यात आली.लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी अखेरच्या टप्प्यांत सुरू असून नाशिकमध्ये २७व्या फेरीअखेर गोडसे यांनी एकूण ५ लाख ६३ हजार ५९९ मते मिळविली असून भुजबळांना मागे टाकले आहे. भुजबळ यांच्या पारड्यात २ लाख ७१ हजार ३९५ मते पडली आहेत. गोडसे यांच्या रूपाने नाशिकमध्ये दुस-यांदा खासदार रिपिट होण्याचा विक्रम झाला आहे.नाशिक लोकसभा मतदारसंघात एकूण अठरा लाखांहून अधिक मतदार असून, यंदाच्या निवडणुकीत ५९ टक्के मतदान झालंय. गेल्या निवडणुकीत हेमंत गोडसे यांना ४ लाख ९४ हजार ७३५ मतं मिळाली होती, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार छगन भुजबळ यांना ३ लाख ७ हजार ३९९ मतं मिळाली होती. या निवडणूकीत मागील मतांच्या तुलनेत गोडसे यांनी ६७ हजार २९९ मते अधिक मिळविली आहे. तसेच समीर भुजबळ यांचा २ लाख ९२ हजार २०४ मतांनी दणदणीत पराभव केला आहे. मागील लोकसभेत गोडसे यांनी भुजबळ यांचा १ लाख ८७ हजार ३३६ मतांनी पराभव केला होता.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालNashikनाशिक