शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या के. के. वाघ तंत्रनिकेतनमध्ये 7 डिसेंबरपासून दोन दिवस राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 17:47 IST

के. के. वाघ तंत्रनिकेतन महाविद्यालयात राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन तथा प्रकल्प स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून, शालेय विद्याथ्र्यामधील सुप्त वैज्ञानिक गुणांना या प्रदर्शनाच्या माध्यातून व्यासपीठ निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देदोनदिवसीय राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनदोन गटात होणार प्रकल्प स्पर्धा विद्यार्थ्यांमधील सुप्त वैज्ञानिक गुणांना प्रदर्शनाच्या माध्यातून व्यासपीठ

नाशिक : येथील के. के. वाघ तंत्रनिकेतन महाविद्यालयात  गुरुवारपासून (दि.7)   दोनदिवसीय राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन तथा प्रकल्प स्पर्धाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्राचार्य पी. टी. कडवे व संस्थेचे सचिव के. एस. बंदी यांनी दिली. महाविद्यालयाने गेल्या 4 वर्षापूर्वी जिल्हास्तरावरून सुरू केलेल्या या उपक्रमाला राज्यस्तरीय स्वरूप प्राप्त झाले असून, शालेय विद्यार्थ्यांमधील सुप्त वैज्ञानिक गुणांना या प्रदर्शनाच्या माध्यातून व्यासपीठ निर्माण झाले आहे.विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून घेण्यात येणारी प्रकल्प स्पर्धा दोन गटात होणार असून, पहिला अ गट शालेय विद्यार्थ्यांसाठी असून, यात आठवी ते दहावीचे विद्यार्थी सहभाग घेऊ शकणार आहेत. तर अकरावी व बारावीचे विद्यार्थी कनिष्ठ महाविद्यालयीन ब गटात सहभाग घेऊ शकणार आहेत. गटात हसत खेळत विज्ञान, भौतिक व रसायन शास्त्रतील मूलभूत सिद्धांतावर आधारित प्रयोग, जलसंवर्धन व सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, टाकाऊ उपयुक्त साहित्य निर्मिती, स्मार्ट व्हिलेज, स्मार्ट पार्किग, वैज्ञानिक खेळणी या विषयांवर विद्यार्थ्यांना प्रकल्प सादर करता येणार आहे. तर ब गटात कृषी उपयोगी अवजार निर्मिती व तंत्रज्ञान, शून्य कचरा निर्मिती, हरित तंत्रज्ञान, भविष्यातील ऊर्जास्त्रोत, कार्बन डाय ऑक्साईडचे वाढते प्रमाण-समस्या व उपाय, वाहतूक समस्या व उपाय, जुगाड शेती, मृदा संधारण या विषयांवर कनिष्ठ महाविद्यालयीन विद्याथ्र्याना त्यांचे प्रकल्प सादर करता येणार आहेत. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी आयोजकांनी राज्यातील सुमारे साडेतीन हजाराहून अधिक शाळा, महाविद्यालयांना प्रत्यक्ष तथा पोस्टाद्वारे माहितीपत्र पाठविण्यात आले असून, स्पर्धकांनी त्यांच्या प्रवेशिका 5 डिसेंबर 2017 र्पयत के. के. वाघ तंत्रनिकेतन महाविद्यालयात अथवा महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर सादर करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. यावेळी प्रा. प्रवीण भंडारी, प्रा. गणोश भंडारी, एम. एन. अहेर, प्रा. अशिष लांडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :educationशैक्षणिकscienceविज्ञान