शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

गिते बिहारमधून साधणार अधिकाऱ्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 23:02 IST

नाशिक : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते हे बिहारमधील लोकसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बिहारमध्ये असून, तेथून गुरुवारी (दि. १ मार्च) जिल्हा परिषदेच्या खातेप्रमुखांशी  ते चर्चा करणार आहेत. आगामी अर्थसंकल्पीय सभा आणि मागील आठवड्याच्या कामकाजाचा आढावा ते बैठकीत घेणार असल्याचे समजते.मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांनी प्रशासकीय का ...

ठळक मुद्दे प्रशासकीय का मकाजाला गती देण्याबरोबरच कार्यालयीन शिस्तीलाही प्राधान्यउशिरा येणाऱ्या  कर्मचाऱ्याना नोटिसा बजावल्या जात आहेत.

नाशिक : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते हे बिहारमधील लोकसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बिहारमध्ये असून, तेथून गुरुवारी (दि. १ मार्च) जिल्हा परिषदेच्या खातेप्रमुखांशी  ते चर्चा करणार आहेत. आगामी अर्थसंकल्पीय सभा आणि मागील आठवड्याच्या कामकाजाचा आढावा ते बैठकीत घेणार असल्याचे समजते.मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांनी प्रशासकीय का मकाजाला गती देण्याबरोबरच कार्यालयीन शिस्तीलाही प्राधान्य दिले असून, उशिरा येणाऱ्या  कर्मचाऱ्याना नोटिसा बजावल्या जात आहेत. गेल्या आठवड्यात गिते यांनी दि. २१ रोजी कार्यालयीन वेळेत विविध विभागांना अचानक भेट देऊन पाहणी केली असता कार्यालयीन वेळेत अनेक कर्मचारी गैरहजर आढळून आल्याने या कर्मचाऱ्याचे एक दिवसाचे वेतन कपात करण्यात आले आहे. याबाबतचे पत्र सामान्य प्रशासन विभागाने संबंधित विभागप्रमुखांना दिले असून, संबंधित कर्मचाऱ्यावर वेतन कपातीची कारवाई केली आहे.दोन दिवसांपूर्वीदेखील कार्यालयीन वेळेत जागेवर नसलेल्या काही कर्मचार्यांना त्यांनी नोटिसा बजावल्या आहेत. फाइलींची गती वाढविण्यावर त्यांनी भर दिल्याने दर आठवड्याला ते फाइल्सच्या प्रवासाची माहिती घेत आहेत. कार्यालयात असताना खातेप्रमुखांच्या कामकाजाचादेखील ते आढावा घेत असल्यामुळे त्यांच्या या धडक कारवाईमुळे कार्यालयीन कामकाजाला गती प्राप्त झाली आहे.येत्या ९ मार्च रोजी जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा आहे, तर गिते हे १९ तारखेपर्यंत रजेवर आहेत. या काळातील अर्थसंकल्पासंदर्भातील कामकाजाचा आढावा तसेच ३० टक्के निधी खर्चाच्या तपशीलासंदर्भात ते व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारा माहिती घेण्याची शक्यता आहे.--- इन्फो--प्रभारी पदभार पवार यांच्याकडेमुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते हे बिहार दौऱ्यावर  असल्याने आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कौटुंबिक कारणास्तव रजेवर असल्यामुळे प्रभारी पदभार हा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद