शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक ग्रामपंचायत निवडणूक, मतदानासाठी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 16:05 IST

पहिल्यांदाच होत असलेल्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी मतदारांमध्ये उत्सुकता दिसून आली.

सिन्नर - पहिल्यांदाच होत असलेल्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी मतदारांमध्ये उत्सुकता दिसून आली. सिन्नर तालुक्यातील बारा ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदासह सदस्यांच्या निवडणुकीस मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मतदानासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर गर्दी दिसून येत होती.

सिन्नर तालुक्यातील आशापूर, डुबेरवाडी, कीर्तांगळी, कारवाडी, शास्त्रीनगर, नांदूरशिंगोटे, पाटपिंप्री, शहा, सायाळे, ठाणगाव, उजनी व वडगावपिंगळा या १२ ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदासह ९८ सदस्यपदाच्या निवडणुकीच्या मतदानाला सकाळी साडेसात वाजता प्रारंभ झाला. सकाळपासून प्रत्येक केंद्रावर मतदानाला गर्दी दिसून आली.

१२ सरपंच व ९८ सदस्यांसाठी १२ ग्रामपंचायतींमध्ये मतदान होत आहे. २२ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. ४२ मतदान केंद्रावर होत असलेल्या १२ गावातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ६ निवडणूक अधिकाºयांची नेमणूक करण्यात आली होती.

सकाळी साडेसात वाजता मतदानास प्रारंभ झाला. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत या १२ ग्रामपंचायतींसाठी सरासरी ३८ टक्के मतदान झाले होती. दुपारी दीड वाजता मतदानाची टक्केवारी ५० टक्क्यांच्या आसपास पोहचली होती. त्यानंतर दुपारी तीन वाजता मतदानाच्या टक्केवारीने ६० पर्यंत पोहचली होती. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास नांदूरशिंगोटे व ठाणगाव येथे वादळी वाºयासह पावसाला प्रारंभ झाल्याने उमेदवार, कार्यकर्ते व मतदारांची धावपळ उडाली.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रत्येक मत महत्त्वाचे असते. त्यामुळे जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी कार्यकर्ते धावपळ करतांना दिसून येते होते. नांदूरशिंगोटे येथील सरपंचपद सर्वसाधारण असल्याने येथे मोठी चुरस दिसून आली. दुपारी तीन वाजेपर्यंत तालुक्यात शांततेत मतदान झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडला नव्हता. वावी, सिन्नर व एमआयडीसी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान सुरु असणार असल्याने मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.