शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
4
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
5
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
6
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
7
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
8
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
9
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
10
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
11
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
12
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
13
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
14
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
15
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
16
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
17
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
18
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
19
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
20
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड

Nashik: मनपाचा रस्ते दुरूस्तीचा ‘घाट’, नाशिककरांची खडतर ‘वाट’, पन्नास कोटींची उधळपट्टी

By suyog.joshi | Updated: September 30, 2023 11:18 IST

Nashik: नाशिक शहरात शुक्रवार ते सोमवार चार दिवसांत झालेल्या पावसाने रस्ते दुरुस्तीची तब्बल ४८ कोटी रूपयांची उधळपट्टी पाण्यात गेली आहे. त्यामुळे दररोज खड्ड्यांवरून मार्गक्रमण करणाऱ्या नाशिककरांचा मार्ग अजूनच खडतर बनत चालला आहे.

- सुयोग जोशीनाशिक - शहरात शुक्रवार ते सोमवार चार दिवसांत झालेल्या पावसाने रस्ते दुरुस्तीची तब्बल ४८ कोटी रूपयांची उधळपट्टी पाण्यात गेली आहे. त्यामुळे दररोज खड्ड्यांवरून मार्गक्रमण करणाऱ्या नाशिककरांचा मार्ग अजूनच खडतर बनत चालला आहे. महापालिकेच्या वतीने एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत रस्त्यांवरील दुरुस्तीसाठी तब्बल ४८ कोटी रूपये खर्च करण्यात आले.

गेल्या वर्षी महापालिकेने केलेल्या खराब कामांमुळे रस्त्यांची चाळण झाली होती. त्यावरून मोठा गदारोळही पाहावयास मिळाला. यंदा पावसाने दोन ते अडीच महिने शहराकडे पाठ फिरवल्याने शहरातील रस्त्यांचा प्रश्न जाणवला नाही. परंतु, सध्या सुरू असलेल्या पावसाने पालिकेच्या कामांचे पितळ उघडे पडले आहे. कोट्यवधींचा खर्च रस्त्यांवर होत असतानाही खड्डेच खड्डे दिसू लागले आहेत. शहरात यंदा खड्डे नसल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असताना दोन-तीन दिवसांच्या पावसातच हा दावा फोल ठरला आहे. बांधकाम विभाग दरवर्षी रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधींचा खर्च करते. प्रमुख चौक परिसरात रस्त्यावर डागडुजी करुन काम केल्याचा आव बांधकाम विभागाकडून केला जातो. मात्र, एक दोन पावसातच पालिकेची रस्ते दुरुस्ती पावसाच्या पाण्यात धुतली जाते.

रस्त्यांची पारदर्शकपणे कामे होणार कधी, शहरातील रस्त्यावर दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडून याचा नाहक त्रास नाशिककरांना सहन करावा लागतो. यंदाही खड्ड्यांमुळे शहरातील अनेक रस्त्यांची चाळण होऊ लागली आहे. रस्त्याच्या कामासाठी पाण्यासारखा पैसा ओतूनही शहरात खराब रस्त्यांची समस्या आजही कायम आहे. यंदाही पावसाळ्यात शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले. तसेच कॉलनी अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे महापालिका रस्त्यांवर कोट्यवधीचा रुपयांचा खर्च करूनही रस्त्यांची समस्या कायम आहे.

विभागातील रस्त्यांवर झालेला खर्चविभाग         खर्चनाशिक पूर्व ११ कोटी ९० लाखपश्चिम ३ कोटी ६४ लाखपंचवटी ६ कोटी ३७ लाखसातपूर ८ कोटी ८७ लाखना.रोड ९ कोटी ९३ लाखसिडको ८ कोटी

टॅग्स :Nashikनाशिक