शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

अन्न व औषध प्रशासनाची दूध तपासणी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 17:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : दूूध भेसळीसंदर्भात आलेल्या तक्रारी तसेच मागील काही दिवसांपासून दुधातील भेसळीचे प्रकार मोठ्या शहरात आढळून आल्यानंतर नाशिक विभागामध्येदेखील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने दूध तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.ग्राहकांना सुरक्षित दूध उपलब्ध व्हावे, याकरिता अन्न व औषध प्रशासनाकडून नियमितपणे नाशिक विभागामध्ये दूध संकलन केंद्रे, दूध ...

ठळक मुद्दे२९ नमुने ताब्यात : प्रयोगशाळेत होणार तपासणीगेल्या दोन वर्षांमध्ये कमी दर्जाच्या ७६ नमुन्या प्रकरणी दंड

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : दूूध भेसळीसंदर्भात आलेल्या तक्रारी तसेच मागील काही दिवसांपासून दुधातील भेसळीचे प्रकार मोठ्या शहरात आढळून आल्यानंतर नाशिक विभागामध्येदेखील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने दूध तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.ग्राहकांना सुरक्षित दूध उपलब्ध व्हावे, याकरिता अन्न व औषध प्रशासनाकडून नियमितपणे नाशिक विभागामध्ये दूध संकलन केंद्रे, दूध प्रक्रिया केंद्रे, वितरक, किरकोळ विक्रेते अशा सर्व स्तरावर दुधाचे नमुने घेण्याची कार्यवाही केली जाते. दुधाच्या भेसळीचे गांभीर्य लक्षात घेऊन दूध केंद्रे आणि प्रक्रिया केंद्रांना अचानक भेटी देऊन तपासणी करण्यात येत आहे.दुधामधील भेसळीस आळा घालण्याच्या दृष्टीने नाशिक विभागामध्ये मागील आठवडाभर दुधाचे नमुने घेणेची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये दूध संकलन केंद्रे व दूधप्रक्रिया केंद्रे यांची तपासणी केली जात असून दुधाचे नमुने घेण्यात येत आहेत.या मोहिमेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यात दूध उत्पादक असलेल्या तालुक्यांमध्ये विशेष लक्ष देण्यात आले आहे. विभागातील सर्व अन्नसुरक्षा अधिकाºयांनी एकाच दिवशी १७ ठिकाणांहून २९ दुधाचे नमुने तपासणीकरिता घेतले आहेत. ही मोहीम नाशिक विभागातर्फे सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात आली असून, विभागात १३१ दुधाचे नमुने घेण्यात आले आहेत. प्रयोगशाळेकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर अहवालाच्या अनुषंगाने संबंधितांविरुद्ध पुढील कारवाई करण्यात येणार आहे.नाशिक विभागामध्ये मागील वर्षी ३०२ दुधाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी ८४ नमुने कमी दर्जाचे घोषित झाले होते. एकाही नमुन्यात आरोग्यास हानिकारक अशी भेसळ आढळून आली नव्हती. गेल्या दोन वर्षांमध्ये कमी दर्जाच्या ७६ नमुन्या प्रकरणी रुपये १९,४८,००० इतका दंड वसूल करण्यात आला आहे.सहआयुक्त उदय वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त भूषण मोरे, अन्नसुरक्षा अधिकारी विवेक पाटील, किशोर बाविस्कर, सागर नेरकर, ओझरकर, भरत इंगळे यांनी मोहीम राबविली.

टॅग्स :NashikनाशिकFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग