शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

नाशिकमध्ये हॉटेलचे अतिक्रमित बांधकामे पाडले

By श्याम बागुल | Updated: September 6, 2018 15:42 IST

सातपूर विभागातील हॉटेल नालंदा येथील १८ बाय ३० मीटर चे शेडचे बांधकाम, हॉटेल अन्नपूर्णा यांचे साडेतीन बाय सहा मीटरचे शेडचे बांधकाम तसेच सायंतारा बिल्डिंग सावरकरनगर येथील कब्जेदार नरेंद्र कोठावळे यांचे तीन बाय नऊ मीटरचे शेडचे बांधकाम महापालिकेमार्फत हटविण्यात आले.

नाशिक : सातपूर विभागातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेने हातोडा फिरविण्यास सुरुवात केली असून, नालंदा हॉटेल व अन्नपूर्णा हॉटेलचे सामासिक अंतरातील अनधिकृत शेडचे बांधकाम पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले. त्यामुळे अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहे.सातपूर विभागातील हॉटेल नालंदा येथील १८ बाय ३० मीटर चे शेडचे बांधकाम, हॉटेल अन्नपूर्णा यांचे साडेतीन बाय सहा मीटरचे शेडचे बांधकाम तसेच सायंतारा बिल्डिंग सावरकरनगर येथील कब्जेदार नरेंद्र कोठावळे यांचे तीन बाय नऊ मीटरचे शेडचे बांधकाम महापालिकेमार्फत हटविण्यात आले. सातपूरच्या विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड, अतिक्रमण विभागाचे अधीक्षक महेंद्रकुमार पगारे, नगर नियोजन विभागाचे अभियंता नांदुर्डीकर यांच्यासह अतिक्रमण विभागाची दोन पथक एक जेसीबीसह पोलीस बंदोबस्तात अतिक्रमित बांधकामे काढण्यात आली. महापालिकेच्या सहाही विभागांमध्ये अशाप्रकारे ना फेरीवाला क्षेत्र, सार्वजनिक रस्ते, फूटपाथ चौक, याठिकाणी अतिक्रमणे करून व्यवसाय करणारे भाजीविक्रेते, फळविक्रेते, हॉकर्स, टपरीधारक व इतर तत्सम व्यावसायिक यांच्याविरुद्ध अशाच प्रकारची कडक कारवाई करून प्रसंगी पोलीस विभागात गुन्हे दाखल करण्यात येतील. तसेच शहरातील बेकायदेशीर बांधकामे करणाऱ्या तसेच पार्किंगच्या जागांवर असलेली बेकायदेशीर व अतिक्रमित बांधकामे काढून घेण्याबाबत यापूर्वी नागरिकांना वेळोवेळी जाहीर आवाहन करण्यात आल्याचे अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे सांगण्यात आले. 

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिकाNashikनाशिक