शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक विभागाचा ८८.२२ टक्के निकाल

By admin | Updated: May 31, 2017 00:33 IST

नाशिक विभागाचा ८८.२२ टक्के निकाल

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा (बारावी) निकाल मंगळवारी (दि.३०) जाहीर झाला आहे. नाशिक विभागातून या परीक्षेत ८८.२२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत ९२.३८ टक्के मुली, तर ८५.११ टक्के मुलांनी यश प्राप्त केले केले असून, यंदा बारावीच्या परीक्षेत मुलांपेक्षा ७.१७ टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्याने यंदाही बारावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. नाशिक विभागातून बारावीच्या परीक्षेत ९१ हजार ८६ मुली, ८६ हजार २५१ मुले असे एकूण एक लाख ५९ हजार ३३७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १ लाख ४० हजार ५७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र गोधने यांनी पत्रकार परिषदेत दिली. या परीक्षेत ७७ हजार ५२३ मुलींसह ६३ हजार ५१ मुले उत्तीर्ण झाले. या परीक्षेत नाशिक जिल्ह्णातून ७० हजार १७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७० हजार ९९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ६१ हजार ४७ म्हणजेच ८७.९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले . धुळे जिल्ह्णात १९५ कनिष्ठ महाविद्यालयांतील २४,४४१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २४ हजार ४०९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील २२,१८६ म्हणजेच ९०.८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जळगावच्या २७७ महाविद्यालयांमधून नोंदणी केलेल्या ४९,१७९ विद्यार्थ्यांपैकी ४९,१०७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील ४३,०२७ म्हणजे ८७.६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.इन्फो - विभागात नंदुरबार अव्वल नाशिक विभागातील सर्वाधिक निकाल नंदुरबार जिल्ह्णाचा लागला. अतिशय दुर्गम भाग असलेल्या आदिवासी नंदुरबार जिल्ह्णात १४,३१५ (९१.०५ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्णातून सर्वाधिक (६१,०४७) विद्यार्थी उत्तीर्ण झाले असले तरी नाशिकमधून परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाणही अधिक असल्याने उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत नाशिकची घसरण झाली आहे.  विक्रम मोडीतबारावीच्या परीक्षेत नाशिक विभागातील विद्यार्थ्यांची कामगिरी उंचावली आहे. २०१५ मध्ये ८८.१३ टक्के, २०१६ मध्ये ८३.९९ टक्के निकाल लागला होता. तर यंदा ८८.२२ टक्के असा सर्वाधिक निकाल लागला आहे.