शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

नाशिक विभागाचा निकाल ८६ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 00:29 IST

महाराष्ट राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, नाशिक विभागाचा निकाल ८६.१३ टक्के इतका लागला.

नाशिक : महाराष्ट राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, नाशिक विभागाचा निकाल ८६.१३ टक्के इतका लागला. मागील वर्षीनिकालाची टक्केवारी ८८.२२ इतकी होती. यंदाही विभागात मुलीच हुशार असल्याचे सिद्ध झाले असून, मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९० टक्के इतके आहे. विद्यार्थ्यांना येत्या १२ जून रोजी गुणपत्रकांचे वाटप करण्यात येणार आहे.फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा नाशिक विभागाचा निकाल विभागाचे सचिव मारवाडी यांनी जाहीर केला. त्यानुसार विभागात नाशिक जिल्ह्याचा निकाल ८६.८५ टक्के इतका लागला. धुळे जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक ८८.८७ टक्के, तर जळगाव जिल्ह्याचा निकाल ८४.२० आणि नंदुरबार जिल्ह्याचा निकाल ८४.७० टक्के इतका लागला. विभागाच्या एकूण निकालाची टक्केवारी ८६.१३ इतकी आहे.  नाशिक विभागातून १ लाख ६० हजार २८४ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १ लाख ३८ हजार ५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८६.१३ टक्के इतके आहे. विभागातील २२६ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. विभागात एकूण २२४ कॉपीचे गैरप्रकार समोर आले होते.मुलींचीच बाजीनाशिक विभागात सातत्याने मुलींनी बोर्डाच्या परीक्षेत झेंडा रोवला आहे. यावर्षीदेखील मुली याला अपवाद नाहीत. विभागातील चारही जिल्ह्यांत मुलींचा वरचष्मा राहिला आहे. विभागात ९१,०४७ मुलांनी परीक्षा दिली होती, त्यातील ७५,३०७ मुले उत्तीर्ण झाली. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८२.७१ टक्के इतके आहे, तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९०.६३ टक्के इतके आहे. विभागात ६९,२३७ मुली परीक्षार्थी होत्या, त्यापैकी ६२,७४८ मुली उत्तीर्ण झाल्या.पुनर्मूल्यांकनाबाबतफेब्रुवारी-मार्च २०१८ परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. छायाप्रत मिळाल्यापासून पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विहित शुल्क भरून विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांना अर्ज करणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांचेपुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी मंडळाशी संपर्क करावा, असेदेखील आवाहन करण्यात आले आहे.गुणपडताळणी आणि छायाप्रतीआॅनलाइन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची व्यवस्था परीक्षा मंडळाने केली आहे. यासाठी आवश्यक त्या अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेला आहे. संकेतस्थळावरील अर्जाची प्रत काढून तो अर्ज विद्यार्थ्यांना भरता येणार आहे. यासंदर्भात आवश्यकता असल्यास माहितीसाठी या विभागीय मंडळाकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गुणपडताळणीसाठी संकेतस्थळावरील गुणपत्रिकेच्या साक्षांकित प्रतीसह गुरुवार, दि. ३१ मे ते शनिवार, दि. ९ जूनपर्यंत विहित शुल्क भरून अर्ज करता येणार आहे. छायांकित प्रतीसाठी गुरुवार, दि. ३१ मे ते मंगळवार, दि. १९ जूनपर्यंत विहित शुल्क भरून अर्ज करता येणार आहे.

टॅग्स :HSC Result 2018बारावी निकाल २०१८