शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नाशिक डिव्हाईन सायक्लोथॉन : रस्ता सुरक्षिततेसाठी नियम पाळण्याचे दिव्यांगांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 17:21 IST

सायक्लोथॉनची सुरुवात करण्यात आली. यावेळी सामान्य नागरिकांना नेत्र दान, दुचाकी वापरताना हेल्मेट वापरा, रस्ता सुरक्षिततेसाठी नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले.

ठळक मुद्देदिव्यांगांप्रती स्नेहभाव व्यक्त दिव्यांग सायकलीस्टच्या सोबत २ व्यक्ती पूर्णवेळ१० दिव्यांगांनी स्वतंत्रपणे सायकल चालवली

नाशिक : समाजामध्ये दिव्यांग व्यक्तींप्रती सामान्य नागरिकांमध्ये स्नेहभाव निर्माण व्हावा, जागृती व्हावी त्यांच्या समस्या जाणून घेता याव्यात या उद्देशाने नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड महाराष्ट्र, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन आणि एसकेडी ग्रुप यांच्या संयुक्त प्रयत्नांतून आज व्हॅलेंटाईनडेच्या निमित्ताने 'डिव्हाइन सायक्लोथॉन'चे आयोजन करण्यात आले होते.नाशिक​चे​ पोलीस आयुक्त ​डॉ. ​रवींद्रसिंग सिं​ग​ल, ​गुरु गोविंदसिंग फाउंडेशनचे गुरदेवसिंग विर्दी,​नगरसेविका हेमलता पाटील, प्रियांका घाटे आणि जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती मनीषा पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवत सायक्लोथॉनची सुरुवात करण्यात आली. यावेळी सामान्य नागरिकांना नेत्र दान, दुचाकी वापरताना हेल्मेट वापरा, रस्ता सुरक्षिततेसाठी नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले.नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन अध्यक्ष जसपाल सिंग विर्दी यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या डिव्हाईन सायक्लोथॉनचे सलग तिसऱ्यावर्षी आयोजित करण्यात आले होते. या डिव्हाईन सायक्लोथॉनमध्ये ८० हुन अधिक अंध मुले-मुली,अस्थिव्यंग, मतीमंद, सेलेब्रल प्लासी, बहुविकलांग, डिफ-ब्लाइंड असे दिव्यांग स्त्री पुरुष सहभागी झाले.

महात्मानगर क्रिकेट ग्राउंड ते भोंसला मिलिटरी स्कुल गेट, कॉलेज रोड अशा मार्गावर झालेल्या या डिव्हाइन सायक्लोथॉनमध्ये दोन चाकी​​ सायकल्स टँडम सायकल्स, लहान मुलांसाठी तीन चाकी सायकल्स, व्हीलचेअर वापरण्यात आल्या.

नाशिक सायकलीस्टच्या सदस्यांनी स्वतःच्या सायकल्स यावेळी उपलब्ध करून दिल्या.​ ​गेल्यावर्षी नॅब महाराष्ट्रचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री यांनी सांगितल्याप्रमाणे यावेळी १० दिव्यांगांनी स्वतंत्रपणे सायकल चालवली. सायकल चालविण्याइतपत काहींना प्रशिक्षण आणि सराव घेण्यात आला होता.

या सायक्लोथॉन दरम्यान प्रत्येक दिव्यांग सायकलीस्टच्या सोबत २ व्यक्ती पूर्णवेळ साथ देण्यासाठी उपलब्ध होते. यावेळी टाळ्या आणि चुटक्या यांच्या दिशेने दिव्यांग सायकलीस्ट सायकल चालवताना दिसत होते. यावेळी मदत करणारे नॅब आणि नाशिक सायकलीस्टचे सदस्य या दिव्यांगांच्या दुनियेत हरवून जात सायक्लोथॉन पूर्ण करण्यास मदत करताना दिसले.

​यावेळी छत्रपती पुरस्कार विजेते साहसी सायकलिस्ट डॉ. हितेंद्र महाजन आणि महेंद्र महाजन बंधूंचा विशेष सत्कार नाशिक सायकलिस्टच्या वतीने करण्यात आला.​

टॅग्स :NashikनाशिकChildren Dayबाल दिन