शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यात कोसळधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 02:01 IST

हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याप्रमाणे नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २) मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणांच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, गोदावरीसह अन्य नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडली आहे.

ठळक मुद्दे४१५ मिलिमीटर पाऊस , नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी; ६० जणांना हलविले सुरक्षितस्थळी

नाशिक : हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याप्रमाणे नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २) मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणांच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, गोदावरीसह अन्य नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दिवसभरात तब्बल १७१ मिलिमीटर पाऊस झाल्याने धरण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाल्यामुळे गंगापूर धरणातून विसर्ग वाढविल्यामुळे गोदावरीला पूर आला असून, जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.नाशिकच्या गंगापूर आणि दारणा धरण पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे गंगापूर धरण ८७ टक्के, तर दारणा ८८ टक्के भरले आहे. शनिवारी (दि. ३) गंगापूरमधून १७ हजार ७४८ हजार, दारणातून २३ हजार क्यूसेक विसर्ग सुरू असून, नांदूरमधमेश्वरमधून मराठवाड्याला जायवाडी धरणासाठी तब्बल ८३ हजार ७७३ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्ह्यात दिवसभरात सुमारे ४१५.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, गोदावरी व दारणेने धोक्याची पातळी ओलांडली आहे. गोदावरीच्या पुरामुळे दुतोंड्या मारुती बुडून रामसेतूवरूनही पाणी गेले. तर दारणा नदीची पाणीपातळी वाढल्याने लहवीत-वंजारवाडी पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील गावांचा संपर्क तुटला होता. खबरदारीचा उपाय म्हणून येथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नाशिकसह, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, पेठ, सुरगाणा आदी तालुक्यांमध्ये शुक्रवारी (दि. २) मध्यरात्रीपासून जोरदार श्रावणसरी कोसळल्या असून, पावसाचा जोर वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सायखेडा गावातील सुमारे ६० जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. गंगापूर व दारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे गंगापूर धरणांची पातळी वाढली असून, दोन्ही धरणांमधून विसर्ग वाढविण्यात आल्याने गोदावरीला या पावसाळ्यातील सर्वांत मोठा पूर आला आहे. गंगापूर धरणसाठ्यात झपाट्याने वाढ होत असल्याने शनि२९वारी सकाळी ९ वाजता गंगापूर धरणातून सुरू असलेल्या ११ हजार क्यूसेकचा विसर्ग दुपारी १ वाजता १३ हजार, तर दुपारी २ वाजता १७ हजार ७४८ क्यूसेकपर्यंत वाढविण्यात आला, धरणसाठ्यात वाढ सुरूच असल्याने सायंकाळी ५ वाजता होळकर पुलाखालून तब्बल २० हजार क्यूसेक विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.इन्पो-जिल्ह्णातील धरणातून विसर्ग (क्यूसेक)गंगापूर : १७ हजार ७४८गौतमी गोदावरी : ६ हजार २२५आळंदी : ६८७दारणा : २३ हजार १९२भावली : १ हजार ५०९वालदेवी : ५०२नांदूरमधमेश्वर : ८३ हजार ७७३.पालखेड ५ हजार ३०७चनकापूर : ७ हजार ३०७पूनद : २८९५ क्यूसेकहरणबरी ५६ क्यूसेकहोळकर पूल : २० हजार ३७५——इन्फो-दिवसभरातील तालुकानिहाय पाऊसनाशिक जिल्ह्णात शनिवारी (दि.३) सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत ४१५.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यात सर्वाधिक त्र्यंबकेश्वर तालुक्यात १७१ मिलीमीटर पाऊस कोसळला असून, नाशिकमध्ये २१.१, इगतपुरी ४०, दिंडोरी ३१, पेठ ७६ व सुरगाण्यात ७१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर चांदवडमध्ये अवघा दोन व कळवणमध्ये एक मिलीमीटर पाऊस पडला असून, सिन्नर, देवळा, येवला, नांदगाव या तालुक्यांसाठी शनिवारचा दिवस कोरडाच गेला.

टॅग्स :Nashikनाशिकgodavariगोदावरीfloodपूर