शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’; 'बिपरजॉय' वादळाचा हवामानावर प्रभाव

By अझहर शेख | Updated: June 10, 2023 19:22 IST

नाशिक शहरासह जिल्ह्यात प्रखर उन्हाच्या झळा अनुभवयास येत असून नागरिकांना उष्णतेचा दाह सोसावा लागत आहे.

नाशिक : शहरासह जिल्ह्यात प्रखर उन्हाच्या झळा अनुभवयास येत असून नागरिकांना उष्णतेचा दाह सोसावा लागत आहे. कमाल तापमानात मागील तीन दिवसांपासून वाढ होत असून उन्हाच्या तीव्रतेचा चटका जाणवत असताना येत्या सोमवारपर्यंत (दि.१२) हवामान खात्याकडून नाशिककरिता ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. वीजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाटासह वादळी पाऊस जिल्ह्यात होऊ शकतो, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

नैऋुत्य मान्सूनची वाटचाल महाराष्ट्राच्या दिशेने सुरू झाली आहे. पुढील ४८तासांत मान्सून राज्याच्या काही भागात आणखी सरकण्याची श्यक्यता हवामान खात्याकडून वर्तविली जात आहे. दुसरीकडे अरबी समुद्रात उठलेले ‘बिपरजॉय’नावाच्या चक्रीवादळाने हवामानाची स्थिती अधिक बिघडविली आहे. मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत गारपीटीचीही श्यक्यता या तीन दिवसांत वर्तविण्यात आली आहे. शनिवारपासून (दि.१०) ते सोमवारपर्यंत (दि.१२) नाशिकमध्ये मान्सुनपुर्व पाऊस पुन्हा एकदा जोरदार वादळी स्वरुपात हजेरी लावण्याची श्यक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. यामुळे या तीन दिवसांत नाशिककरांना अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे.

जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये वादळी वारा ताशी ३० ते ४० किमी इतक्या वेगाने वाहू शकतो. वीजांचा कडकडाट अन् ढगांच्या गडगडाटासह पाऊस अपेक्षित असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. देवळा, मालेगाव तालुक्यात शुक्रवारी मृगजलधारांचा जोरदार वर्षाव झाला. यावेळी वादळी वाऱ्यामुळे काही भागांतील घरे, शाळांवरी पत्रेही उडाले होते. चक्रीवादळाचा प्रभावनाशिक जिल्ह्याच्या हवामानावरही ‘बिपरजॉय’ या चक्रीवादळाचा प्रभाव दिसू लागला आहे. अचानकपणे सकाळपासून दुपारी चार वाजेपर्यंत ऊन कमालीचे तापत आहे. यानंतर वारा सुटतो आणि ढगाळ हवामान तयार होते. शुक्रवारी जिल्ह्यात मालेगाव, देवळा या तालुक्यांमध्ये वादळी पावसाने हजेरी लावली. पुढील दोन दिवस ‘यलो अलर्ट’ असल्यामुळे सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकcycloneचक्रीवादळ