शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 नाशिकमध्ये ६०.१३ टक्के मतदान; निफाडला सर्वाधिक ७३.६८ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 22:24 IST

Maharashtra Election 2019 ६वाजेअखेर नाशिक मध्य मतदारसंघात ५५.८० टक्के सर्वाधिक मतदान झाले. नाशिक पुर्व मतदारसंघातएकूण ४७.१० टक्के मतदान झाले

ठळक मुद्देनाशिक पुर्व मतदारसंघातएकूण ४७.१० टक्के मतदान २००९साली विधानसभा निवडणूकीत नाशिकमध्ये ६०.१५ टक्के

नाशिक : विधानसभा निवडणूकीची मतदान प्रक्रिया सोमवारी (दि.२१) शहरासह जिल्ह्यात सर्वत्र शांततेत पार पडली. जिल्ह्यात ६ वाजेअखेर एकूण ६०.१३ टक्के इतके मतदान झाले. शहरात सर्वाधिक नाशिक मध्य मतदारसंघात ५५.८० टक्के इतके मतदान झाले. तसेच निफाड तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक ७३.६८ टक्के इतके मतदान नोंदविले गेले.नाशिक जिल्ह्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण ५४.५४ टक्के इतके मतदान नोंदविले गेले. जिल्ह्यात या वेळेत सर्वाधिक कळवणमध्ये ६७.३५ तर दिंडोरी मतदारसंघात ६५.१७ टक्के इतके मतदान झाले. मात्र अखेरच्या तासाभरात चित्र बदलले. फिरले आणि कळवणमध्ये ६७.८२ टक्के तर दिंडोरीत ६९.६८ टक्के मतदान सहा वाजेअखेरपर्यंत झाले. पावसाने उघडीप दिल्याने सायंकाळी ५ वाजेनंतर नाशिक मध्यमधील विविध मतदान केंद्रे तसेच पुर्वमधील पंचवटी भागातील मतदान केंद्रांवर गर्दी लोटल्याचे दिसून आले. त्यामुळे ६वाजेअखेर नाशिक मध्य मतदारसंघात ५५.८० टक्के सर्वाधिक मतदान झाले. नाशिक पुर्व मतदारसंघातएकूण ४७.१० टक्के मतदान झाले. नाशिक पश्चिम मतदारसंघात ६ वाजेअखेर एकूण ५४.२० टक्के मतदान झाले. नाशिक देवळाली मतदारसंघात ६ वाजेअखेर ५६.०५ टक्के मतदान नोंदविले गेले.२००९साली झालेल्या विधानसभा निवडणूकीत नाशिकमध्ये ६०.१५ टक्के तर २०१४ साली नाशिकमध्ये ६४.६० टक्के मतदान झाले होते. या तुलनेत यंदा ४ टक्क्यांनी एकूण मतदानात घट झाल्याचे दिसून येते.नाशिक शहर व परिसरात सकाळी ७ वाजेपासून मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली. सर्वच केंद्रांवर सकाळच्या सुमारास शुकशुकाट जाणवला. हळुहळु ज्येष्ठ नागरिकांची पावले केंद्रांकडे वळू लागल्याचे चित्र दिसले. सकाळी ११ वाजेपर्यंत शहरातील पुर्वमध्ये १२.७३%, मध्यमध्ये अवघे १०.६०% तर पश्मिमध्ये ११.५९% टक्के इतके मतदान नोंदविले गेले होते. यानंतर दुपारी १ वाजेपर्यंत अनुक्रमे वरील तीनही मतदारसंघात २२.९५ %, १९.३४%, २५.६४% टक्के मतदान झाले. दुपारपर्यंत अल्पशी वाढ वरील मतदारसंघात झाली; मात्र दुपारी दोन वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या कालावधीत मोठ्या संख्येने मतदारराजा घराबाहेर पडल्याने मतदानाचा टक्का वाढत गेला. मध्य मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४०.६६टक्के, पुर्वमध्ये ४० टक्के, पश्चिममध्ये ४८.२९ टक्क्यांपर्र्यंत मतदान नोंदविले गेले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत देवळाली मतदार संघाचा आकडा ४७.५२ टक्क्यांवर पोहचला होता. नाशिक जिल्ह्यात ६वाजेअखेर एकूण ६०.१३ टक्के इतके मतदान झाले. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nashik-central-acनाशिक मध्यnashik-east-acनाशिक पूर्वnashik-pcनाशिकdindigul-pcडिंडीगुलniphad-acनिफाडkalwan-acकळवण