शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्हा रुग्णालय : ‘हरले डॉक्टर, हरले विज्ञान जिंकला मांत्रिक...’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 18:17 IST

वैद्यकिय अधिकाऱ्याने विश्वास दाखवून खडे विकणा-याला वैद्यकिय कक्षात बोलावून त्याच्याकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न के ल्याच्या कृतीचा निषेध

ठळक मुद्दे ‘आता रोगावर इलाज, लिंबू-मिरची, कशाला पाहिजे इंजेक्शन, औषधाला खर्ची’ ‘आप’च्या आंदोलनकर्त्यांच्या गळ्यात लिंबू-मिरचीच्या माळा

नाशिक : राशींचे विविध खडे आणि त्या खड्यांचा पडणारा मानवी जीवनावर प्रभाव यावर चक्क जिल्हा रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या वैद्यकिय अधिकाऱ्याने विश्वास दाखवून खडे विकणा-याला वैद्यकिय कक्षात बोलावून त्याच्याकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न के ल्याच्या कृतीचा निषेध म्हणून आम आदमी’च्या कार्यकर्त्यांनी जिल्हा रुग्णालयात ‘लिंबू-मिरची’ आंदोलन केले.येथील जिल्हा शासकीय रु ग्णालयामध्ये येणा-या रु ग्णांवर वैद्यकीय उपचार न करता, त्यांच्यावर तंत्र-मंत्राद्वारे, राशींच्या खड्यांद्वारे उपचार करण्यात यावे, अशी उपरोधिक मागणीही ‘आप’च्या पदाधिका-यांनी निवेदनाद्वारे केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी गळ्यात लिंबू-मिरचीच्या माळा घालून जिल्हा रुग्णालयात आंदोलन केले. राशींच्या खड्यांत स्वारस्य दाखिवणा-या वैद्यकिय अधिका-याच्या कृतीचा निषेध नोंदविला. यावेळी आंदोलकांनी रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ‘हरले डॉक्टर, हरले विज्ञान जिंकला मांत्रिक, कधी होणार सज्ञान? असा प्रश्नही एका फलकाद्वारे उपस्थित केला. तसेच ‘आता रोगावर इलाज, लिंबू-मिरची, कशाला पाहिजे इंजेक्शन, औषधाला खर्ची’ अशा घोषणांचे फलकही झळकविले.आंदोलनात जितेंद्र भावे, जसबीर सिंग, विनायक येवले, गिरीश उगले आदी सहभागी झाले होते. दरम्यान, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गजानन होले यांनी निवेदन स्विकारुन संबंधितांची चौकशी सुरू झाली असून त्याद्वारे कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच यावेळी जिल्हा रुग्णालयातील अपुरा वैद्यकिय कर्मचारी वर्गाबाबतही होले यांनी लवकरच भरती प्रक्रियेबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले.--

टॅग्स :Nashikनाशिकhospitalहॉस्पिटलAam Admi partyआम आदमी पार्टीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल